घरठाणेबारा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

बारा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

Subscribe

ठाणे । दोन दिवसांपूर्वी हरवलेल्या 12 वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करुन त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरुन नाल्यामध्ये फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळील दहिसर-मोरी भागातील ठाकुरपाडा परीसरात रहात असलेल्या शकिल शहा यांचा मुलगा शानू शहा सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास खेळण्यासाठी जातो म्हणून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने त्याची आई जरीना हिने तो हरवला असल्याची तक्रार मंगळवारी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याचा सर्वत्र शोध सुरु असतानाच बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शहा कुटुंब रहात असलेल्या जवळच्या किरवली गावातील एका नाल्यामध्ये आढळून आल्याची माहिती त्याच्या पालकांना मिळाली.

हातपाय बांधून त्याचा मृतदेह गोणीत भरुन नाल्यामध्ये टाकण्यात आला होता. त्याचे डोळे बाहेर आले होते, तसेच ओठ कापले होते. याप्रकरणी शिळ-डायघर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा पोलीस कसोशीने तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे शकिल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -