घरठाणेमुलगी झाल्याने पालकांनीच केली हत्या

मुलगी झाल्याने पालकांनीच केली हत्या

Subscribe

मुंब्रा पोलिसांच्या तपासात उघड

ठाणे । मुलीचा सांभाळ कसा करायचा? मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नात हुंडा कसा द्यायचा? अशा अनेक प्रश्नांनी घर केल्यामुळे आपण पाचव्या दीड वषीर्य लबीबा या मुलीची हत्या केल्याची कबुलीच जाहीद शेख (38) आणि त्याची पत्नी नुरानी (28) यांनी दिल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. अवघ्या दीड वर्षीय मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिला या दाम्पत्याने गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तिला आजार झाल्याचा बहाणा करीत तिच्यावर उपचार केले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा 18 मार्च 2024 रोजी मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर 19 मार्च रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील कब्रस्थानामध्ये तिला परस्पर दफनही केले होते.

तिच्या संशयास्पद मृत्यूची माहिती तिच्या फोटोसह एका व्यक्तीने 4 एप्रिल 2024 रोजी मुंब्रा पोलिसांना दिली होती. त्याच आधारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय दवणे, सहायक पोलीस निरीक्षक कोरडे यांच्या पथकाने केला. मुलीचा मृतदेह दफनभूमीतून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर विधीवत कौसा कब्रस्थानात ते दफन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या डोक्यावर शस्त्राने वार केल्याचे आढळले. याच प्रकरणात जाहीद आणि नूरानी या दाम्पत्याला 10 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या या दाम्पत्याने अखेर दोन मुले आणि तीन मुली असल्यामुळे त्यातील या धाकट्या मुलीचा खून केल्याची कबुली दिली. यातील पहिल्या मुलीचाही खुनाचा प्रयत्न केला होता, अशी कबूलीही त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -