घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : गडकरींनी 10 लाख मतांनी विजयी व्हावं; कुणी दिल्या...

Lok Sabha 2024 : गडकरींनी 10 लाख मतांनी विजयी व्हावं; कुणी दिल्या शुभेच्छा?

Subscribe

Lok Sabha Election 2024 : आजपर्यंत गडकरी यांनी केलेले काम पाहता, या निवडणुकीतही त्यांचाच विजय होईल, असे चित्र आहे. मात्र, नितीन गडकरी यांचा 5 नव्हे तर 10 लाख मतांनी विजय व्हावा, अशी इच्छा अभिनेता सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आता काही तासांवर आले आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली – चिमूर, भंडारा – गोंदिया आणि रामटेक या जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. लवकरच नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, शामसुंदर बर्वे, राजू पारवे, आदी दिग्गजांचे भवितव्य निवडणूक पेटीत बंद होणार आहे. (Lok Sabha Election 2024 Suniel Shetty praises Nitin Gadkari for his road building work wishes him huge victory)

अभिनेता सुनील शेट्टींनी दिल्या शुभेच्छा

महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे विकास ठाकरे यांचे आव्हान आहे. आजपर्यंत गडकरी यांनी केलेले काम पाहता, या निवडणुकीतही त्यांचाच विजय होईल, असे चित्र आहे. मात्र, नितीन गडकरी यांचा 5 नव्हे तर 10 लाख मतांनी विजय व्हावा, अशी इच्छा अभिनेता सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. तसा एक व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी 10 हजार 652 मतदान केंद्र

व्हिडीओमध्ये काय?

नितीन गडकरींनी देशातील रस्त्यांचं फारच उत्तम काम केलं आहे. त्यांनी या देशाचा नकाशाच बदलून टाकला असल्याचं सुनील शेट्टी यांनी म्हटलं आहे. प्रत्येक गरीब व्यक्तीला स्वतःच्या घरापर्यंत योग्य रस्ता, वाहतूक मिळेल, यासाठी तुम्ही प्रयत्न केले आणि हे काम प्रत्यक्षात देखील उतरवलं. त्यामुळे अनेकांची उत्तम सोय झाली. तब्बल एक लाख किमी.चे राष्ट्रीय महामार्ग तुम्ही बांधले आहेत. त्याशिवाय अंतर्गत रस्ते वेगळेच. तुमच्या या कामामुळेच तुम्हाला अनेक लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत. या उत्तम कामासाठीच तुम्ही जिंकावं अशी माझी इच्छा असल्याचं सुनील शेट्टी म्हणाले. (Lok Sabha Election 2024 Suniel Shetty praises Nitin Gadkari for his road building work wishes him huge victory)

- Advertisement -

विरोधकांचं डिपॉझिट जप्त व्हावं – सुनील शेट्टी

तुमचं काम एवढं मोठं आहे की, तुमच्या समोर उभ्या राहिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त व्हायला हवं. तुम्ही 5 काय 10 लाख मतांनी जिकांवं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला जे हायवे मॅन म्हटलं जातं, ते उगीच नाही. तर त्यामागे तुमची मेहनत आहे. आज भारतातील रस्त्यांबद्दल बोलायचं झालं तर ते फक्त याच काळात झाले आहेत, मग ते वाजपेयी यांचे सरकार असो की मोदींचे. तुम्ही सर्वांनी एकत्रितरित्या खूप उत्तम काम केले असल्याचे देखील शेट्टी म्हणाले. मी कुठेही गेलो, आणि चांगला रस्ता दिसला की तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी तुम्हाला नेहमीच फोन करतो. तुमचे वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही तुमच्या टीमला सोबत घेऊन जाता. तसेच ‘नेकी कर और दर्या में डाल’, म्हणजेच कुणासाठी काहीतरी करायचं आणि ते विसरून जायचं, असं तुमचं काम आहे, असं म्हणत सुनील शेट्टी यांनी गडकरींना विजयासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत. (Lok Sabha Election 2024 Suniel Shetty praises Nitin Gadkari for his road building work wishes him huge victory)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सी-व्हिजिल Appवरील तक्रारींचा फडशा


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -