घरठाणेराम मंदिरामुळे ‘भारत’ जगाचा मार्गदर्शक

राम मंदिरामुळे ‘भारत’ जगाचा मार्गदर्शक

Subscribe

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवरायांचा 350 वा शिवराज्यभिषेक दिन यंदा साजरा होत आहे, त्याचवर्षी अयोध्येत 496 वर्षानी पुन्हा रामलल्लाचे मंदिर उभे राहत आहे. ही एकप्रकारे शिवरायांना आदरांजली असून 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल. तेव्हा, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे. याचे प्रतिक हे राममंदिर असणार आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक, शिवभक्त मोहन शेटे यांनी केले. ठाण्यात सुरू असलेल्या 38 व्यारामभाऊम्हाळगीस्मृती व्याख्यानमालेत बुधवारी शिवरायांचा आठवावा प्रताप हे दुसरे पुष्प मोहन शेटे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते.

आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा त्वेषपूर्ण शैलीत श्रोत्यांसमोर उलगडताना 6 जून 1674 च्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे महत्त्व विषद केले. शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेप्रती स्वराज्यातील सर्वभौमत्व होते. याच शिवराज्यभिषेकाच्या 350 व्या वर्षी अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभे झाले, हीच शिवरायांना खरी आदरांजली आहे. 22 जाने. रोजी लोकार्पण होणारे राम मंदिर केवळ दगडाची वास्तु नाही तर, परिवर्तन आहे. जसा शिवरायांचा 50 वर्षाचा काळ युगप्रवर्तक होता, ज्याचे परिणाम पुढील 100 ते 150 वर्षे दिसले. त्याचप्रमाणे 2024 हे वर्ष युगप्रवर्तक असेल. अयोध्येत राम मंदिर झाल्याने संपूर्ण जगाला भारत गुरुस्थानी गेल्याचे बघायला मिळणार आहे. किंबहुना, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे, याचे प्रतिक हे राम मंदिर असल्याचे शेटे यांनी सांगितले.

- Advertisement -

‘हा’ निकाल म्हणजे शिवनीती अन गनिमी कावा

छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आजच्या काळात सुद्धा वापरता येतो, हे आत्ताच्या सत्तासंघर्षाच्या निकालाने आपणा सर्वांना दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांची नीती आजदेखील कालबाह्य झालेली नाही. शिवनिती म्हणजे प्रखर देशभक्ती असे निरिक्षण इतिहास अभ्यासक शिवभक्त मोहन शेटे यांनी नोंदवले. तसेच, समुद्रात 350 कोटींचे स्मारक सरकार उभारत आहे, हे प्रेरणादायी आहे. पण समुदमार्गे एकही अतिरेकी देशात घुसणार नाही, अशी व्यवस्था उभारणे हेच खरे स्मारक ठरेल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -