घरठाणेथंडीच्या कडाक्याने साथीची डोकेदुखी वाढली

थंडीच्या कडाक्याने साथीची डोकेदुखी वाढली

Subscribe

म्हाडस गावात आढळले डेंग्यूचे 30 रुग्ण, ताप,सर्दी, खोकला,अंगदुखीने लहान बालकांचा समावेश

मुरबाड । वातावरणातील बदलामुळे लहान मुलांसह नागरिकांना आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. यात लहान मुलांना ताप सर्दी खोकला तर नागरिकांना हातपाय, अंगदुखी, डोकेदुखी वाढली असल्याने खासगी दवाखान्यांना जत्रेच रूप आले आहे. त्यातच गावागावात स्वच्छ्ता मोहिम राबवली जात नाही, धूर फवारणी होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव साथीला कारणीभूत ठरत आहे. येथील म्हाडसगावात 29 डिसेंबर पासून आजपर्यंत 30 डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याची शासकिय आकडेवारी असली तरी खासगीत अनेक रुग्ण उपचार घेत असल्याचे समजते. तर शासकिय रूग्णालयात सात रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुकाआरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी दिली.

सोबत या गावात पाच डॉक्टरांचे पथक तैनात केल्याची माहिती दिली. काही रूग्ण खाजगी दवाखाण्यात उपचार घेत असल्याने ठोस आकडा समजत नसला तरी या गावात डेंग्यूने थैमान घातल्याने भितीचे वातावरण आहे. संध्याकाळच्या थंडीच्या गारव्यामुळे वातावरणांत थंडावा होऊन त्याचा फटका आरोग्यावर बसून येत आहे. ताप, सर्दी, खोकला, हातपाय, अंगदुखी वाढल्याने उपचारासाठी खाजगी दवाखाण्याची वाट धरली जाते. हा वातावरणातील बदल असला तरी खासगी डॉक्टर या रूग्णांना वेगवेगळ्या टेस्ट करण्यास भाग पाडतात. तशाही येथील टेस्ट करणार्‍या बोगल लॅब नाक्या नाक्यावर फोफावल्या असून या लॅब याच डॉक्टारांच्या संगनमताने रुग्णांची लूट करीत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -