घरठाणेValentine's Day च्या दिवशी भिवंडीतील शेतकऱ्यानं खरेदी केलं हेलिकॉप्टर!

Valentine’s Day च्या दिवशी भिवंडीतील शेतकऱ्यानं खरेदी केलं हेलिकॉप्टर!

Subscribe

शेतीच्या कामासाठी जोडधंदा असलेल्या व्यवसायासाठी हे हेलिकॉप्टर खरेदी केल्याने संपूर्ण तालुक्यात या अवलियाचीच चर्चा सुरू

हौसेला मोल नाही हे वाक्य कित्येकदा एखाद्याची चेष्टा करण्यासाठी वापरले जातो. परंतु भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. जनार्धन लडकु भोईर यांनी शेतीच्या कामासाठी जोडधंदा असलेल्या व्यवसायासाठी हे हेलिकॉप्टर खरेदी केल्याने संपूर्ण तालुक्यात या अवलियाचीच चर्चा सुरू आहे. भिंवडीतील वडपे गावातील जनार्धन लडकु भोईर या अवलियाने व्हेलेंनटाईन या दिवसाचे औचित्य साधत चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे.

- Advertisement -

वडपे गावातील सामान्य आगरी कुटुंबात जन्म घेणार्‍या जनार्धन भोईर यांनी सुरुवातीस शेती व्यवसाय करत दुग्ध व्यवसायात आपला जम बसवला. त्यानंतर जमवलेल्या पुंजीचा बांधकाम व्यवसायात निवेश केला. बांधकाम व्यवसायात प्रगती साधत आपल्या कल्पक बुध्दीचा वापर करत ग्रामिण भागातील या व्यावसायिकाने चित्रपट निर्मिती, पुढे गोदाम व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केली. या व्यवसायामुळे त्यांना देशात दुरदुर प्रवास करावा लागतो. विनाविलंब दुरच्या ईच्छीत स्थळी पोहचण्याकरीता आपल्याकडे हेलिकॉप्टर सारखे साधन असावे, अशी त्यांची मनोमन ईच्छा होती. व्यावसायिक मित्रमंडळीनी आग्रह केल्यानतंर व्हेलेंनटाईनच्या दिवसी ३० फुट लांबीचे भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर खरेदी केले. काल हेलिकॉप्टरची हवाई चाचणी घेण्यात आली. यावेळी त्यांनी पहिल्या उड्डाणचा मान आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी दिला.

भोईर यांनी बांधकाम व्यवसायाला सुरूवात करून आपल्या जमिनीवर गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. त्यांचा व्यवसायानिमित्ताने उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तींशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले. स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथे नेहमी जावे लागते, तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी घेतला.

- Advertisement -

(रणधीर शिंदे, कल्याण ग्रामीण वार्ताहर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -