Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ज्येष्ठ निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे निधन

ज्येष्ठ निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे निधन

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. पुण्याच्या राहत्या घरी आज सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. न्यायमूर्ती म्हणून सावंत यांनी अनेक ऐतिहासिक घटनांवर निर्णय दिले आहे. पुण्यातील पहिली एल्गार परिषद पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. (Retired Justice P B Sawant Dies in Pune) उद्या सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांची अतिशय शिस्तप्रिय आणि संयमी न्यायमूर्ती म्हणून ओळख आहे. (Retired Justice P B Sawant Dies in Pune)

मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) मिळवल्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली म्हणून सराव सुरु केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांनी जबाबदारी सोडली होती. पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. विशेष म्हणजे जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी त्यांच्या कार्यकाळातील महत्वाची केस होती. 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आले. २००३ च्या तत्कालीन महाराष्ट्र सरकराचे मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते. 23 फेब्रुवारी 2005 रोजी आपला अहवाल सादर केला, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, परंतु विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले गेले. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला.

- Advertisement -

 

- Advertisement -