ईस्टर्न एक्सप्रेस वेवर कारला आग

आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

car fire in Eastern Express
ईस्टर्न एक्सप्रेस वेवर कारला आग

ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर शुक्रवारी सकाळी आग लागली. हेमांगी जंगीड यांच्या मालकीच्या कारने अचानक पेट घेतला. मुलुंड टोलनाक्याजवळ आनंदनगर या ठिकाणी ही घटना घडली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग विझवण्यात यश आले आहे. सकाळी कार लागलेल्या या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.


हेही वाचा – कोपरी पूलावरची वाहतूक १४ तास राहणार बंद