घरठाणेचिखलोली स्टेशन, भुसंपादनासाठी 89 कोटींचा निधी मंजूर

चिखलोली स्टेशन, भुसंपादनासाठी 89 कोटींचा निधी मंजूर

Subscribe

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या चौथी मार्गीकेचा प्रश्न मार्गी लागला असून नुकत्याच पार पडलेलेल्या शासनाच्या बैठकीत या मार्गात तसेच चिखलोली रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणार्‍या शेतकर्‍यांच्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी शासनाने 89 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच उर्वरित 46 कोटींची रक्कम येत्या काही दिवसात मंजूर केली जाणार आहे. त्यामुळे राज्य शासनानेही या प्रकल्पात आपला वाटा दिल्याने लवकरच भुसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार असून चिखलोली रेल्वे स्थानक आणि तिसर्‍या चौथ्या मार्गिकेच्या कामालाही गती मिळणार आहे.

अंबरनाथ, बदलापूर शहरे आणि या दोन्ही शहरांच्या वेशीवर वेगाने विकसित होणार्‍या चिखलोली तसेच जांभुळ, वसत आणि अंबरनाथ तालुक्यातील काही ग्रामीण भागांसाठी चिखलोली रेल्वे स्टेशन रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. गेले 25 वर्षे केवळ चर्चेत असलेल्या चिखलोली स्थानकाच्या कामाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे गती आली असून त्यानुसार कल्याण ते बदलापूर पर्यंतची तिसरी चौथी मार्गिका आणि चिखलोली रेल्वे स्थानकासाठी लागणार्‍या भुसंपादन प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे. तर चिखलोली स्थानक आणि तिसर्‍या चौथ्या मार्गीकेचे काम हे राज्य सरकार आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त भागादारीतून केला जात आहे.

- Advertisement -

त्यानुसार या प्रकल्पाच्या एकूण 134 कोटी रक्कमे पैकी राज्य आणि केंद्र सरकारला पन्नास पन्नास टक्के आपला वाटा प्रकल्पासाठी द्यायचा आहे. मात्र या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आपल्या रक्कमेचा 50टक्के वाटा जमा केला नव्हता. त्यामुळे प्रकल्पाचे काम आणि मोबदला वाटपाचे काम गेले दोन वर्षे रखडले होते. अखेर मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत कल्याण ते बदलापूर तीसरी चौथी मार्गिका आणि चिखलोली स्थानकासाठीचाही 89 कोटींचा राज्य शासनाच्या वाट्याचा निधी उल्हासनगर उप विभागीय अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गेले दोन वर्षे रखडलेले तिसर्‍या चौथ्या मार्गिकेचे काम आणि चिखलोली स्थानकाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पासाठी अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली , बेलवली, मोरीवली, खुंटवली, कात्रप, कुळगाव आणि उल्हासनगरमधील काही भाग बाधित होणार असून त्यासाठी एकूण 6.76.54 हेक्टर आर क्षेत्र संपादीत केले जाणार आहे. यात सर्वाधित 4.37 हेक्टर आर क्षेत्र हे चिखलोली स्थानकासाठी संपादित केले जाणार आहे. यांतर्गत एकूण सहा गावातील अंदाजीत 828 जण बाधित होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -