घरठाणेठाण्याच्या ग्रामीण भागात लसीकरण मोहीमेस नागरिकांनी फिरवली पाठ, जिल्हा प्रशासनाकडून 'मिशन मोड'मध्ये...

ठाण्याच्या ग्रामीण भागात लसीकरण मोहीमेस नागरिकांनी फिरवली पाठ, जिल्हा प्रशासनाकडून ‘मिशन मोड’मध्ये मोहीम हाती

Subscribe

ग्रामीण भागात आतापर्यंत ८६ हजार ७८६ नागरिकांचे केले लसीकरण

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन लसीकरणावर भर देत आहे. अशातच ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी अनेक गैरमसज आहेत. त्यामुळे तेथील नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे त्यांनी आता ग्रामीण भागात ‘मिशन मोड’ लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी नियुक्त केलेली पथके घरोघरी जाऊन लसीकरणाविषयी असलेल्या गैरसमज दूर करून नागरिकांना लस देणार आहेत. या मोहिमेतनुसार येत्या आठ दिवसांत दीड लाख नागरिकांचे लसीकरण प्रशासन करणार आहे.

ग्नामीण भागात लसीकरणाविषयी नागरिकात गैरसमज आहेत. त्यामुळे आता लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दीच दिसून येत नाही. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात आतापर्यंत ८६ हजार ७८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्यामुळे येत्या १ मे पासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता असून या पाश्र्वभूमीवर ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘मिशन मोड’ लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्य़ातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्यांमध्ये २३ ते ३० एप्रिल या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

या मोहमेसाठी जिल्हास्तरावर अधिकारी नेमले असून ते गावस्तरावतील अधिकाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करून देणार आहेत. ग्रामपंचायतमार्फत लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीनुसार शिक्षक, ग्रामसेवक, गाव स्तरावरील अधिकारी-कर्मचारी हे घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेऊन लस का घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करणार आहेत. १ मेपासून लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ४५ वर्षांपुढील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण याआधीच पूर्ण व्हावे, हे ‘मिशन मोड’ लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट आहे. असे ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -