ठाण्यात इमारतीच्या गॅलरीचा भाग पडला; तीन कुटुंबांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

Dangerous Buildings and Houses in the affected areas will be evacuated with the help of mumbai police

ठाणे: राबोडीत इमारतीच्या गॅलरीचा भाग पडल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कळवा, राजछाया इमारती समोरील आशिर्वाद या इमारतीच्या गॅलरीचा भाग पडला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. त्या इमारतीमध्ये कोणी राहत नसुन, जवळ असलेली आशिर्वाद इमारत/B मध्ये राहणाऱ्या तिन्ही कुटुंबांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

हवामान खात्याने अतिवृष्टी ची शक्यता वर्तवल्याने सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ होता दिसत आहे. त्यातच गुरुवारी दुपारी कळव्याच्या, जुना जुना मुंबई-पुणे रोड असलेली तळ अधिक मजली आशिर्वाद ‘अ ‘या इमारतीच्या गॅलरीचा भाग पडला. अशी माहिती मिळताच घटनास्थळी उप-आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन कक्ष), सहाय्यक आयुक्त (कळवा प्रभाग समिती), उप-अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांसह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, टोरेंट कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १-रेस्क्यू वाहनासह दाखल झाले.

सुदैवाने त्या इमारतीमध्ये कोणी राहत नसल्याने कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच, त्या इमारतीच्या जवळ असलेली तळ अधिक दोन मजली आशिर्वाद ‘बी’ या इमारतीमध्ये राहणाऱ्या तिन्ही कुटुंबांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने पहिल्यांदा सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्या कुटुंबीयांनी आपली राहण्याची व्यवस्था स्वतःच्या नातेवाईकांकडे केलेली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


ठाण्यात शिवसेनेला खिंडार, ३ माजी महापौरांसह ६६ माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश