घरठाणेदर महिन्याला होणार ठाण्यातील नालेसफाईची

दर महिन्याला होणार ठाण्यातील नालेसफाईची

Subscribe

महापालिकेची चाचपणी सुरू

पावसाळा आला की नालेसफाई करणे हे एक समीकरण झाले आहे. ते समीकरण मोडीत काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. यावर एक उपाय म्हणून डॉ. विपीन शर्मा यांनी दर महिन्याला ठामपा कार्यक्षेत्रातील नालेसफाई करण्याची चाचपणी सुरू केली असून त्यानुसार त्याचा संबंधितांना अहवाल सादर करण्याचे आदेश नुकत्याच झालेल्या एका बैठकीत दिले आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर कचऱ्याने तुडुंब भरून वाहणारे नाले कचरामुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ११७ किलोमीटर अंतराचे एकूण ३०६ नाले आहेत. त्यामध्ये मुंब्य्रात ३१ किलोमीटर लांबीचे ९२ नाले आहेत. कळव्यात ९ किलोमीटरचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किलोमीटरचे ३७, वर्तकनगरमध्ये १९ किलोमीटर लांबीचे २५, मानपाडा १७ किलोमीटरचे २६, नौपाडा येथे साडेचार किलोमीटरचे २४, वागळे इस्टेटमध्ये ८ किलोमीटरचे २०, उथळसरमध्ये साडेसात किलोमीटरचे २४ आणि कोपरीत ४ किलोमीटर लांबीचे ११ नाले असून त्यामध्ये शहरातील सांडपाण्याचा निचरा होतो. यामध्ये प्लास्टिक, धर्माकोल, लाकडे आदी वस्तू फेकण्यात येतात.

- Advertisement -

त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबण्याचे प्रकार नेहमीच पाहण्यास मिळतात. त्यातच पावसाळा जवळ आल्यावर महापालिका वर्षातून एकदा नालेसफाईची कामे करते. त्या कामाची डेडलाईन ही साधारण ३१ मेची मुदत ठेकेदारांना दिली जाते. मात्र पावसाळा सुरू झाला तरी ही कामे पूर्ण होत नाहीत. त्यातच एखाद्या वेळी मोठा पाऊस झाला तर, काही ठिकाणी नाले तुंबल्याने त्या लगतच्या आणि आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरते. अशाप्रकारे घडणाऱ्या पावसाळ्यातील घटना लक्षात घेता, यापूर्वी वर्षातून दोनदा नाले सफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता आणि त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांतर ही पद्धत बंद करून पुन्हा वर्षातून एकदाच नालेसफाई करण्याची पद्धत सुरु केली गेली. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी घाईघाईने नालेसफाई केली जात असल्यामुळे शहरात नाले तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने चित्र पाहण्यास मिळतात.

याबाबत, भाजपने महापालिका आयुक्तांकडे उपाययोजना करण्याबाबत मागणी लावून धरली. त्यानुसार, पालिका आयुक्त डॉ शर्मा यांनी तातडीने ही बाब लक्षात घेत, महिन्याला नालेसफाई कशी होईल याची चाचपणी केली. त्यानुसार, त्यांनी संबंधित विभागाला ही तसे आदेश दिले आहेत. तसेच लवकर याबाबत अंतिम निर्णय ही होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -