घरठाणेअखेर ‘या’ वसाहतींचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

अखेर ‘या’ वसाहतींचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

Subscribe

खासगी लोकसहभागातून उभी राहणार घरे

ठाणे । ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. तसेच यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेने गेल्या 25 वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसन केलेल्या वसाहतींचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, खासगी लोकसहभागातून पुनर्वसनाची घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी पर्यंत या प्रकल्पाच्या गतीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित पालिका अधिकार्‍यांना या बैठकीत दिले आहेत.

तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांचे पुर्नवसन महानगरपालिकेच्या भुखंडावर केले.गेल्या 25 वर्षांपासून समतानगर येथील आनंदराम नगर, राजीव गांधी नगर, लोकमान्यनगर येथील सिध्दिविनायक पुर्नवसन वसाहत महानगरपालिकेच्या भुखंडावर वसविण्यात आली होती. परंतू, या वसाहतींचे काळानुरूप अतिशय दैणी अवस्था झालेली असून सर्व चाळी व इमारती या धोकादायक झालेल्या आहेत.

- Advertisement -

या वसाहतींचे पुर्नविकास करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. परंतू, जुन्या नियमानुसार सर्व रहिवाश्यांना समाविष्ट करण्यासाठीचे चटई क्षेत्र उपलब्ध होत नसल्यामुळे हा पुर्नविकास थांबलेला होता. परंतू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नवीन आलेल्या युनिफाईड डि.सी.आर.मुळे जास्त चटई क्षेत्र मिळत असल्याने या इमारतींचा पुर्नविकास होऊ शकतो, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी या बैठकीत ठाणे महापालिकेच्या निर्दशनास आणून दिले. हा प्रकल्प खाजगी लोकसहभागातून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी समांतरपणे बायोमेट्रिकचा सर्व्हे देखील करण्याच्या सूचना यावेळी पालिका आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी वसाहतीतील सर्व महिला रहिवाशांसह आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केली.

आयुक्तांनी नवीन नियमावलीचा आधार घेऊन पुढील दिड महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. त्यामुळे नवीन वर्षामध्ये आनंदराम नगर, राजीव गांधी नगर व सिध्दिविनायक वसाहतींचा पुर्नविकास होईल.
– प्रताप सरनाईक, आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -