घरठाणेकोरोनाचे नियम पाळा अन्यथा कठोर कारवाई

कोरोनाचे नियम पाळा अन्यथा कठोर कारवाई

Subscribe

भिवंडी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचा इशारा

भिवंडी महापालिका हद्दीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन हॉटेलसह एका सुपर मार्केट सीलबंद केले असून इतर पाच हॉटेलबाबत सोमवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांतर्गत ही कारवाई झाली. पन्नास टक्के उपस्थिती, कामगार, हाॅटेल तसेच इतर कर्मचा-यांचे लसीकरण, त्याची खातरजमा करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई झाली. भिवंडी शहरातील काही हॉटेल्सची प्रत्यक्ष तपासणी केली असता काही ठिकाणी 50 टक्केपेक्षा जास्त गिऱ्हाईक आढळून आल्याने या हॉटेल्सवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर काही हॉटेल्स सील करण्यात आलेली आहेत.

प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत सुपर मार्केट आणि फ्रुट प्राइड चाविंद्रा या दोन्हीवर कारवाई केली. या ठिकाणी जे कर्मचारी होते, त्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसतानाही ते काम काम करीत होते. असे निदर्शनास आल्याने अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त दिलीप खाने यांनी दोन्ही हॉटेल्स सील केली.
या हाॅटेल्सना नियमानुसार त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. तसेच प्रभाग समिती पाच अंतर्गत सहायक आयुक्त सुनील भोईर यांनी बारादरी हॉटेल आणि किर्ती बियर बार या दोन्हींवर कारवाई करून ती हॉटेल देखील सील करण्यात आली. त्याच बरोबर प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत बाळाराम जाधव यांनी लिबर्टी हॉटेल यांच्याकडे लसीकरण पूर्ण न झालेले कर्मचारी काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लिबर्टी हॉटेल यांना पाच हजार रुपयांचा दंड केला आहे.

- Advertisement -

तर प्रभाग समिती चार अंतर्गत इंडिया हॉटेल, हिंदुस्तान हॉटेल, असरार मिठाईवाला यांची दुकाने यांची देखील तपासणी केली असता या ठिकाणी देखील काम करीत असलेले काही कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे प्रभाग अधिकारी शामिम अन्सारी यांनी संबंधित हॉटेल मालक यांना कारणे दाखवा नोटिसा बजावली. तसेच काकूबाई चाळ येथील गोल्डन हॉटेल मध्ये 50 टक्के पेक्षा गिऱ्हाईक यांची उपस्थिती असल्याने आणि गर्दी जास्त असल्याने या हॉटेलमध्ये कारवाई केली. यावेळी विना मास्क नागरिक हॉटेल मध्ये बसलेले आढळून आल्याने या हॉटेलवर एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने दिलेल्या सूचना जर पाळल्या नाहीत तर या पुढे अजून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -