घरठाणे९० किलो गांज्यासह त्रिकूट जेरबंद; ठाणे पोलिसांची कारवाई

९० किलो गांज्यासह त्रिकूट जेरबंद; ठाणे पोलिसांची कारवाई

Subscribe

बदलापूर रोडवरील भालपाडा गांव, काटई हायवे येथे ३ जण चारचाकीतून १०० ते १२० किलो वजनाचा गांजा विक्रीकरीता घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा,अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथक तयार करत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंबरनाथ आणि बदलापूर येथील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठाणे: गांजा विक्रीसाठी चारचाकीतून आलेल्या रवी मुन्नीनाल जैस्वाल (३५), हसीन कय्युम खान (२५) आणि मोहम्मद शादाफ रियाझ सिद्धीकी (२७) या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले.

त्यांच्याकडून ९ लाखांचा ९० किलो गांजा आणि कार, मोबाईल असा १७ लाख ३६ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. ही कारवाई बदलापूर रोडवरील भालपाडा गांव, काटई हायवे येथे करण्यात आली. याप्रकरणी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

बदलापूर रोडवरील भालपाडा गांव, काटई हायवे येथे तिघेजण चारचाकीतून १०० ते १२० किलो वजनाचा गांजा विक्रीकरीता घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा,अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत अंबरनाथ आणि बदलापूर येथील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांनी आणलेल्या कारच्या डीक्की, बॉनेट, दरवाजा, सिटच्या खाली अशा वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेला गांजा पोलिसांनी जप्त केला. यामध्ये एकूण ५४ बंडल आहेत. त्याची किमत ९ लाख आहे. ९० किलो गांज्यासह कार, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १७ लाख ३६ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला.

- Advertisement -

याप्रकरणी त्रिकुटाविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट ८ (क), २० (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस उप निरीक्षक दिपेश किणी करत आहेत.
ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस निरीक्षक गिरीष बने, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, पोलीस हवालदार तरडे, विकांत पालांडे, वासरवाड, हेमंत महाले, संदीप भांगरे, महेश साबळे, तडवी, पोलीस शिपाई पादीर, आणि चौधरी यांनी केली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -