घरठाणेहाजी मलंग यात्रा रद्द

हाजी मलंग यात्रा रद्द

Subscribe

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी हाजीमलंग यात्रा कोरोना महामारीमुळे यंदा रद्द करण्याचा निर्णय हाजी मलंग बाबा ट्रस्ट, प्रांत अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी हाजीमलंग यात्रा कोरोना महामारीमुळे यंदा रद्द करण्याचा निर्णय हाजी मलंग बाबा ट्रस्ट, प्रांत अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अंबरनाथ तालुक्यातील हाजी मलंग डोंगरावर हाजी मलंग बाबाची दरगाह असून या ठिकाणी १० दिवसांची उरूस, यात्रा साजरी करण्यात येते. या यात्रेत हजारो भाविक देशविदेशातून येत असतात. त्यामुळे रहदारी वाढल्याने प्रचंड प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

यंदा कोरोना महामारी असल्याने दक्षता घेण्याच्या दृष्टीने शुक्रवारी प्रांत अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रांत अधिकारी जयराज कारभारी, अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख, उल्हासनगर परिमंडळ पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते , सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे, हाजी मलंग ट्रस्टचे अध्यक्ष नासिर खान उपस्थित होते, या बैठकीत सध्याच्या कोरोना महामारी परिस्थिती हाजी मलंग यात्रेला परवानगी देण्याविषयी विस्तृत चर्चा झाली, या चर्चेत यावर्षी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

२२ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान हाजी मलंग यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय हाजी मलंग ट्रस्टने घेतला आहे.या संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात या विषयावर चर्चा झाली. चर्चे अंती राज्य प्रशासन, पोलीस प्रशासन आणि हाजी मलंग ट्रस्टने यात्रा रद्द करण्याचे जाहीर केले आहे.
-जयराज कारभारी, प्रांत अधिकारी उल्हासनगर

हाजी मलंग यात्रा हा भाविकांसाठी आस्थेचा विषय आहे. मात्र यंदाच्या कोरोना महामारीमध्ये गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून यंदा ही यात्रा रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
-नासिर खान, अध्यक्ष हाजी मलंग ट्रस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -