घरठाणेपुन्हा बंद नको असेल तर काळजी घ्यायलाच हवी

पुन्हा बंद नको असेल तर काळजी घ्यायलाच हवी

Subscribe

वेध परिसराचा । ठाणे

कोरोनाचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढताना दिसत आहे. त्यातच गेल्या चोवीस तासात हा वेग दुप्पटीने वाढला असताना आता महापालिका आयुक्त असो या मंत्री किंवा आमदार -खासदार ही मंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकून पडली आहेत. त्याचबरोबर यामध्ये प्रामुख्याने नोकरदार वर्गावर गदा आली आहे.

लागण झालेल्या रुग्णांना तशी सौम्य लक्षणे असून काहींना लक्षणे नसल्याची बाब पुढे येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत आता रुग्ण संख्या वाढीचा वेग जास्त असला तरी यामध्ये घाबरून जाण्याचे काही कारण नाही. तसेच बहुतांशी रुग्ण हे गृहविलीगिकरणातच उपचार घेत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाबरोबर आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याने मात्र नागरिकांनी सावधानता बाळगून कोरोना नियमाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करणे तितकेच गरजेचे असल्याचे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तर या वाढत्या रुग्ण संख्येने शाळा बंद केल्या गेल्या, अब किस की बारी…याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात परदेशातून आलेल्या नागरिकांना ओमायक्रॉनची लागण होण्यास सुरुवात झाली. त्यातच राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीत आढळून आला. या नव्या व्हेरिएंटने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असताना, सरत्या वर्षाच्या शेवटी कोरोनाचा संसर्ग अचानक वाढला. हळूहळू ती संख्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणे एकाच आकडयावर काही दिवस स्थिर न राहत ती झपाट्याने वाढत आहे. तिचा वेग हा मंगळवारी दुप्पटीने वाढल्याचे दिसून आले. हा वेग जरी मोठ्या प्रमाणात असला तरी त्याची लक्षणे सौम्य आहेत. तर काहींना ती लक्षणे दिसत नाहीत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा आता कोरोनाची दाहकता कमी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

पहिल्या लाटेत हॉस्पिटलाजेशन हे १० टक्के होते. ते दुसऱ्या लाटेत ते १० ते १२ टक्के झाले होते. मात्र सद्यस्थितीत ते प्रमाण वाढले नाही तर ते खूपच कमी असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. तसेच येणारा ताप हा दोन लाटेपेक्षा बऱ्यापैकी कमी येताना दिसत आहे. अशक्तपणाची लक्षणेही आता सौम्य झाली आहेत.

- Advertisement -

एकीकडे संख्या वाढल्याने सुरू केलेल्या शाळा काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे आता पुढे कोरोना रुग्ण संख्या अशीच वाढल्यावर अमुक एक बंद तर होणार नाही ना? या भीतीमध्ये प्रामुख्याने व्यापारी वर्ग चिंतेत पडला आहे, पण, डॉक्टरांनी ज्या वेगाने याची लागण होत आहे. त्याच वेगात तो तितकाच खाली येईल. त्याला काही दिवसांचा कालावधी जाईल. परंतू, आता याची लक्षणेही सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र याच्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्याचबरोबर कोरोना नियमांचे त्रिसूत्रीचा अवलंब करणे ही आपली जबाबदारी आहे हे नागरिकांनी विसरू नये. आरोग्य यंत्रणा सज्ज असून ही तिसरी लाट की नाही हे आताच सांगता येणार नसल्याचे मत ही डॉक्टारांनी मांडले आहे. मात्र या वाढत्या संख्येमुळे ही लाट नसून ती दरवर्षी येणार सर्दी,खोकला आणि तापाची साथ असावी अशी ही शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच टेस्ट वाढल्याने रुग्ण संख्या वाढल्याचे ही दबक्या आवाजात बोलले जाऊ लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -