घरठाणेउल्हासनगरात धावणार ई बसेस

उल्हासनगरात धावणार ई बसेस

Subscribe

पालिकेच्या ई बससेवेचे लोकार्पण

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेच्या विविध योजनेंतर्गत शहरात महापालिकेच्या परिवहन ई सेवा आणि सिंधी भवनाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले. पालिकेच्या या उद्घाटन सोहळ्यातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाल्याचे म्हटले जात आहे.
उल्हासनगरातील सपना गार्डनजवळ पालिकेच्या जागेवरील सिंधी भवनाची निर्मिती पालिकेच्या खर्चातून करण्यात आली आहे. या भवनासाठी चार कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र काम अपुरे असताना केवळ निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईघाईने या भवनाचे उद्घाटन होत असल्याचे म्हटले जात आहे. या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, मनपा आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, नगररचनाकार ललित खोब्रागडे, मनपा सचिव प्राजक्ता कुलकर्णी, मनपा पीआरओ छाया डांगळे, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, नाना बागुल, नरेंद्र कुमारी ठाकूर, अरुण अशान पंचम कलानी, भाजपा अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासमवेत पालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की उल्हासनगरच्या विकासासाठी युडीसीआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून शहरवासीयांना मालकी हक्क देण्याचे काम शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हा बदल करून नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. शिंदे म्हणाले कि उल्हासनगरातील पाण्याची समस्या कायम स्वरूपी दूर करण्यासाठी काळू धरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास उल्हासनगर, कल्याण समवेत अन्य शहरांची पाणी समस्या दूर होईल अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

- Advertisement -

सिंधी भवनाचे उद्घाटन आणि नाराजी
सिंधी भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात सिंधी संस्कृती, भाषेबद्दल एकाही नेत्याने माहिती किंवा मांडणी केली नाही. तसेच एकाही नेत्याने स्थानिक सिंधी भाषेत भाषण केले नाही. त्यामुळे सिंधी समुदाय नाराज झाल्याचे चित्र होते.
विशेष म्हणजे हा शासकीय कार्यक्रम असताना राज्याचे मंत्री चव्हाण यांनी खासदार शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केल्याने उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

शहाडमध्ये बसडेपो होणार
दुसरीकडे शहाड येथील उल्हासनगर परिवहन ई सेवेचे लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र शासनाच्या वतीने उल्हासनगरच्या परिवहन सेवेसाठी 100 बसेस देण्यात येणार असून सध्या वीस बसेस मंजूर झाल्या आहेत. या बसेस सोमवारपासून शहरात धावणार आहेत. केंद्राच्या वतीने शहाड येथे बस डेपो बांधण्यासाठी 15 कोटी आणि बस चार्जिंगकरता 23 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -