घरक्राइमबहिणीच्या लग्नासाठी जमवलेल्या लाखो रुपयांवर भावाने मारला डल्ला

बहिणीच्या लग्नासाठी जमवलेल्या लाखो रुपयांवर भावाने मारला डल्ला

Subscribe

घरचे सर्वजण कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असता बेडरूमच्या लोखंडी कपाटातील लॉक तोडून २५ लाख रुपये रोख रक्कम, १ लाख २० हजारांची ३ तोळ्याची सोन्याची चेन, ४० हजार किमतीचे एका तोळ्याचे दागिने असे मिळून एकूण २६ लाख ६० हजार रुपयांची चोरी केली.

भाईंदर – मिरारोडमध्ये सख्ख्या बहिण्याच्या घरात भावानेच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने २५ लाख रुपये रोख रक्कम आणि १ लाख ४० हजार दागिने असे मिळून २६ लाख ६० हजार रुपये हडपले. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी फरमान खान गुजरातमधील वलसाड ताब्यात घेतले. तसेच, २५ लाख २४ हजार ५०० रुपयांचा जप्त केला आहे.
मिरारोडमध्ये गौरव वूड्स येथे राहणाऱ्या मुलीचे लग्न ठरले होते. यासाठी तिच्या मोठ्या बहिणीने आणि आईने घरातील लॉकरमध्ये पैसे ठेवले होते. ही माहिती मालाड मालवणी येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाला माहिती झाली. घरचे सर्वजण कार्यक्रमानिमित्त बाहेर गेले असता बेडरूमच्या लोखंडी कपाटातील लॉक तोडून २५ लाख रुपये रोख रक्कम, १ लाख २० हजारांची ३ तोळ्याची सोन्याची चेन, ४० हजार किमतीचे एका तोळ्याचे दागिने असे मिळून एकूण २६ लाख ६० हजार रुपयांची चोरी केली.
या चोरीबाबत पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शाखेच्या तीन टीम बनवून तपास सुरू केला. चोरी झालेल्या वेळेपासून भाऊ फरमान खान गायब होता. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत गुजरात वलसाड येथून ६ नोव्हेंबर रोजी त्याला ताब्यात घेतले. तसेच, पोलिसांनी त्याच्याकडून २५ लाख २४ हजारांचा व नवीन सहा हजारांचा विकत घेतलेला मोबाईल जप्त केला. सदरील तपास हा पोलीस उपायुक्त विजयकांत सागर व सहायक पोलिस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अविराज कुराडे पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, सहायक फौजदार राजू तांबे यांनी सदरील गुन्हा उघडकीस आणत कारवाई केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -