घरक्राइमप्रेयसीने कर्ज फेडले नाही म्हणून प्रियकराची आत्महत्या, कळव्यातील धक्कादायक घटना

प्रेयसीने कर्ज फेडले नाही म्हणून प्रियकराची आत्महत्या, कळव्यातील धक्कादायक घटना

Subscribe

ठाणे – प्रेमाखातर प्रेयसीला कर्ज मिळवून देणं एका प्रियकराला महागात पडलं आहे. प्रेयसीने आयत्यावेळेला कर्ज भरण्यास नकार दिल्याने प्रियकराने आत्महत्या केली आहे. कळवा येथे ही घटना घडली असून संबंधित प्रेयसीविरोधात कळवा पोलीस अधिक तपास करत आहेत. (Lover committed suicide because girlfriend didn’t pay the debt)

हेही वाचा – पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट, पतीला अटक

- Advertisement -

विक्रम मोरे हा २६ वर्षीय युवक कळवा येथील रमबाई कॉलनीमध्ये राहतो. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका २० वर्षीय युवतीवर त्याचं प्रेम जडलं. दोघंही एकाच फायनान्स कंपनीत कामालाही होते. त्यामुळे प्रेयसीला त्यांने ५० हजार रुपयांचे कर्ज स्वतःच्या नावावर मिळवून दिले.

हेही वाचा – ठाण्यात हस्तीदंताच्या विक्रीचा प्रकार ; अडीच कोटींच्या हस्तीदंतासह दुकली गजाआड

- Advertisement -

मात्र, कर्जाचे हप्ते भरायची वेळ आली तेव्हा त्याच्या प्रेयसीने नकार दिला. वेळेवर कर्जाचे हप्ते न गेल्याने कंपनीकडून सतत तगादा लावला गेला. कर्जाच्या वसुलीसाठी त्याला सतत फोन येऊ लागले. अखेर हे प्रकरण त्याच्या घरीही समजले. मात्र, तरीही त्याच्या प्रेयसीने कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली. कंपन्यांचा तगादा सहन न झाल्याने विक्रम मोरे याने मंगळवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, त्याने आत्महत्येआधी चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा सर्व प्रकार समोर आला. संबंधित मुलीला कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून कळवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -