घरठाणेआपत्ती काळासाठी ठाणे जिल्ह्यात आधुनिक निवारा केंद्र

आपत्ती काळासाठी ठाणे जिल्ह्यात आधुनिक निवारा केंद्र

Subscribe

 दहा तहसीलदारांना प्रत्येक एक दिले केंद्र

पावसाळ्यात एखादी आपत्ती ओढवल्यानंतर अपघातग्रस्त होणाऱ्या नागरिकांना तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने उपलब्ध झालेल्या तब्बल १० आधुनिक इन्फटेबल टेंट (आधुनिक निवारा केंद्र) प्रति एक टेंट प्रमाणे एका तहसीलदारांना वाटप करण्यात आले आहे. यामुळे जरी आपत्ती स्थिती ओढवली तरी, त्या परिस्थितीत ५० ते ७० नागरिकांची तातडीने राहण्याची व्यवस्थेचा मार्ग सुटणार आहे. मध्यंतरी मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकरी मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूरात आल्यावर अचानक आलेल्या वादळी पावसाच्या वेळेस अशाप्रकारचा टेंट वापरत आले होते. त्यामुळे टेंट यंदा पावसाळ्यात उपयोग पडणार असून तातडीने तात्पुरती राहण्याची व्यवस्थेने त्रास होणाऱ्या नागरिकांना दिलासा मिलेळ असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे.
ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण असून येथील लोकसंख्या ही वाढत आहे. अशातच जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये पूर, भूकंप, इमारत कोसळणे, आग लागणे या सारख्या आपत्तीच्या घटना घडत दुर्घटना स्थळी तत्काळ मदत देण्याचा प्रयत्न जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून केला जातो आहे. पूर, दरड, आग लागल्यावर विस्थापितांना तत्काळ निवारा केंद्र उपलब्ध होणे गरजेचे असते. ठाणे जिल्ह्यातील आठ तहसील कार्यालयांना १० बाय ५ मीटरचे सात आणि ४ बाय ४ मीटरचे तीन असे दहा इन्फटेबल टेंट देण्यात आले आहे. तर ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड या तहसील क्षेत्रासाठी प्रत्येकी एक टेंट वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.  तर , जिल्ह्यात एकूण १० इन्फटेबल टेंट उपलब्ध करून दिले आहेत. या मध्ये सात मोठे तर तीन लहान टेंट असून, मोठ्या टेंट मध्ये एकच वेळी ५० ते ७० अपघातग्रस्त राहू शकतील अशी व्यवस्था आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांनी दिली.
” ठाण्यात मान्सून सोबत वर्षभर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित दुर्घटना घडते. अशा आपत्तीच्या काळात तात्पुरती निवारा केंद्र खूप महत्वाची असतात. मध्यंतरी मुंबईत राज्यव्यापी शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्ह्यातुन जाताना , शहापूरात थांबला होता. याचदरम्यान वादळी पाऊस झाला त्यावेळी इन्फटेबल टेंट उपयोगी पडले होते.  त्यामुळे आपत्तीच्या काळात इन्फटेबल टेंट चांगली  भूमिका बजावू शकतील.”
– सुदाम परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -