Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे भयंकर! साकीनाका नंतर उल्हासनगरमध्ये हातोड्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भयंकर! साकीनाका नंतर उल्हासनगरमध्ये हातोड्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका येथे लैगिंक अत्याचारानंतर एका ३२ वर्षांच्या महिलेवर तिच्याच परिचित व्यक्तीने अमानुष मारहाण केली, आणि तिच्या गुप्त भागात रॉड घुसवला. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली, रक्तस्त्राव झाल्याने तिचा राजावाडी रुग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारानंतर उल्हासनगरमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीला हातोड्याचा धाक दाखवत आरोपीनं तरुणीवर बलात्कार केला.

अशी घडली घटना

उल्हासनगर स्थानकानजिक एका १४ वर्षीय मुलीला हातोड्याचा धाक दाखवत बलात्कार झाल्याची भयंकर घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी शिर्डीला आईला भेट देऊन घरी परतत होती. यावेळी या अल्पवयीन तरुणीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर हातोड्याचा धाक दाखवत तिला अनोळखी ठिकाणी नेण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना शुक्रवारी घडली. या धक्कादायक प्रकारानंतर कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून रेल्वे परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

असे सांगितले जात आहे की, ही १४ वर्षीय अल्पवयीन तरुणी उल्हासनगरला तिच्या आजी सोबत राहते. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिर्डीला गेली होती. शिर्डीवरून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ती बसने कल्याणपर्यंत आली. कल्याणमधून ती लोकलने उल्हासनगर स्थानकात पोहोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटल्याने ती त्यांच्यासोबत बोलत होती. यावेळी श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तरुण तिथे आला त्याने हातातील हातोडीने तिच्या मित्रांना धाक दाखवला आणि त्यांना पळवून लावले. तिचे मित्र पळून गेल्यानंतर या तरुणीलाही हातोड्याचा धाक दाखवत जबरदस्तीने अनोळखी ठिकाणी नेलं. पीडित अल्पवयीन तरुणीने त्याला विरोध केला मात्र आरोपीने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.


 

- Advertisement -