Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे राज्य कोणते असो गद्दारी कोणालाही पटत नाही - आव्हाड

राज्य कोणते असो गद्दारी कोणालाही पटत नाही – आव्हाड

Subscribe

ठाण्यात महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष बाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्याबाबत शिवसेनेकडून अपप्रचार चालवल्याचा आरोप  महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता.त्यावर जनतेला खरी परिस्थिती समजावून सांगण्यासाठी मंगळवारी ठाण्यात महाविकास आघाडीने एकत्र येत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चा सत्रात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात आला. यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण निकालाचे आपल्या शब्दात विश्लेषण केले.यासमयी बोलताना आव्हाडांनी शिंदे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यावर जोरदार टीका केली.न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नैतिकतेचा विचार केला तर या सरकारने तात्काळ राजीनामा द्यायला हवा.असे मत यावेळी व्यक्त केले. आपली दोन्ही हात एकत्र ठेवून आपण वज्रमुठ करून लढू या, सत्य परेशान हो सकता है पराजित नही असेही त्यांनी म्हटले. तर मध्यप्रदेश मध्ये कर्नाटकासारखी पुनरुक्ती होईल. राज्य कोणते असो गद्दारी कोणालाही पटत नाही.ते म्हणाले.

ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीकडून न्यायालयाने दिलेला निकाल असे सांगतोय की एकनाथ शिंदे यांची सभापतींनी गटनेता म्हणून केलेली नियुक्ती अवैध आहे, जर गटनेताच अवैध आहे म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा अवैधच आहे. महाराष्ट्रला मिळालेला मुख्यमंत्री हा सर्वोच्च न्यायाल्याच्या दृष्टीने अवैध आहे. महाराष्ट्रच्या इतिहासात ज्या मुख्यमंत्री वर आरोप झाले त्यांनी आपले पद सोडले. नैतिकताच्या आधारावर अनेकांनी राजीनामे दिलेत.त्यामुळे नैतिकता असेल तर हे सरकारला जावंच लागेलं असा घणाघात आव्हाड यांनी या वेळी केलाय. या 16 आमदारांना अपात्र व्हाववच लागेल.कोई उन्हे बचा नाही सकता हे सरकार जाणार म्हणजे जाणारच. असे सांगत मनसेचे आमदार राजू पाटील पक्ष सोडून जातील आणि म्हणतील की मनसे पक्ष माझा आहे. असे उद्गार काढताच सभागृहात एकच हाश्या पिकल्या.तर मी शिवसैनिक नाही आणि मी पवारांच्या जवळचा कार्यकर्ता आहे जे पटत नाही ते उघडपणे बोलण्याचा माझा स्वभाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची घटना लिहिली त्यांच्या सोबत जी लोक आहेत, ती गेली नाही अजून देखील त्यामुळे सेना मजबूत आहेत असेही ते म्हणाले. तर गजानन कीर्तिकर गेल्यामुळे काहीही होत नाही आणि फरक पडत नाही असे ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान या चर्चा सत्रानंतर आता पूर्ण ठाणे शहरात जनजागृती करण्यात येणार असून नागरिकांपर्यन्त खरा निर्णय पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या चर्चा सत्रात काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि संपर्क प्रमुख मधूकर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -