वडिलांसह आजोबांची हत्या केल्यानंतर तरूणाची उंचावरून उडी घेत आत्महत्या

प्रातिनिधीक फोटो

ठाण्यातील मुलुंड पश्चिम एलबीएस रोड वरील वसंत ऑस्कर या कॉप्लेक्समध्ये २० वर्षीय तरूणाने त्याच्या वडीलांसह आजोबांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरूणाने आपल्या वडील आणि आजोबांची हत्या केल्यानंतर स्वतःची आत्महत्या केली आहे. हा प्रकार शनिवारी घडला असून या तरूणाने आपल्या वडिलांना आणि आजोबांना चाकूने ठार मारले. त्यानंतर त्याने मुलुंड येथील वसंत ऑस्कर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

असा घडला प्रकार

मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. २० वर्षीय शार्दुल मांगले या तरूणाने त्याच्या वयवर्ष ८४ असणारे आजोबा सुरेश केशव मांगले आणि ५० वर्षीय मिलिंद केशव मांगले यांना स्वतःची आत्महत्या करण्यापूर्वी चाकूने भोसकून ठार केले. या घटनेच्या वेळी शार्दुलच्या घराची देखभाल करणारे अनंत कांबळे हे घरी होते आणि ते या गुन्ह्याचे साक्षीदार होते. अनंत कांबळे यांनी घडलेल्या प्रकारानंतर शार्दुलच्या वडील आणि आजोबांना वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु मानसिक संतुलन बिघडलेल्या शार्दुलला पाहून ते घराच्या बाथरूममध्ये लपून बसल्याचे सांगितले जात आहे.

घडलेली घटना समजताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या तरूणाने एलबीएस रोड वरील वसंत ऑस्कर या मोठ्या इमारतील सहाव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तो जबर जखमी झाला. याप्रकारानंतर पोलिसांनी या तरूणाला अग्रवाल हॉस्पिटलला दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या तरूणाबाबत अधिक चौकशी केली असता केली असता, त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने वडिल मिलिंद सुरेश मांगले आणि त्याचे आजोबा सुरेश केशव मांगले यांच्यावर घरातील चाकूने वार करून त्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःने देखील स्वतःचा जीव गमावला. या तिघांना अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले आहे.