घरमुंबईमध्य,हार्बर रेल्वे मार्गावर 'या' वेळेत असणार मेगा ब्लॉग

मध्य,हार्बर रेल्वे मार्गावर ‘या’ वेळेत असणार मेगा ब्लॉग

Subscribe

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार ७ मार्च रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार ७ मार्च रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मुख्य लाइन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार अप व डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे. आणि हार्बर लाइनवर कुर्ला – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे.

मध्य रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील. या सेवा मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, विद्याविहार स्थानकावर थांबणार नाहीत व विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४० पासून दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड व मस्जिद या स्थानकावर थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे सेवा उपलब्ध होणार नाहीत.

- Advertisement -

हार्बर लाइन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी – पनवेल विभागा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक कालावधीत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती.


हेही वाचा – ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देऊ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -