घरठाणेअल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात लोटणाऱ्या मायलेकींना अटक

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात लोटणाऱ्या मायलेकींना अटक

Subscribe

दोन अल्पवयीन मुलींची सुटका

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात लोटणाऱ्या मायलेकींना ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने अटक केली आहे. या दोघीच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी महिला बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी सायंकाळी ठाण्यातील जुने पासपोर्ट कार्यालय जवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
एक महिला आणि तिची मुलगी अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात लोटत आहे, अशी माहिती समाज सेवक डॉ.बिनू वर्गीस यांना मिळाली. डॉ. वर्गीस यांनी ही माहिती  ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाचे प्रमुख अशोक कडलग यांना दिली. तसेच ठाण्यातील जुने पासपोर्ट कार्यालया जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये दोन अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात येणार आहे अशीही माहिती वर्गीस यांनी दिली.
या माहितीच्या आधारे मानवी तस्करी विरोधी पथकाचे प्रमुख कडलग यांनी त्या ठिकाणी एक  बोगस ग्राहक म्हणून खात्री करण्यासाठी पाठवले. असता त्या ठिकाणी १६ आणि १७ वयोगटातील मुलींचा एक लाख रुपयांना सौदा होत असताना मानवी तस्करी विरोधी पथकाने आणि डॉ.वर्गीस यांच्या समक्ष हॉटेलवर छापा टाकून विक्री करण्यासाठी आणण्यात आलेल्या मुलीची सुटका करून एक महिला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेवून  अटक करण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -