घरठाणेशासन आपल्या दारी अंतर्गत उपक्रम गतिमानतेने राबवावेत

शासन आपल्या दारी अंतर्गत उपक्रम गतिमानतेने राबवावेत

Subscribe

अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे

 शासन निर्देशानुसार शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरु असून एकाच ठिकाणी एका छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत अशा रीतीने ही योजना करण्यात आली असून, या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी आता संबंधित सर्व विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन हे उपक्रम, योजना नागरीकांमध्ये गतिमानतेने राबवावेत असे भिवंडी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी नुकताच एका आढावा बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांना सांगितले आहे. सदरची आढावा बैठक मुख्यालयातील तिस-या मजल्यावरील आयुक्तांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडली. यावेळी शहर अभियंता सुनील घुगे हजर होते.
अतिरिक्त आयुक्त दिवटे पुढे म्हणाले की महापालिकेच्या शासन आपल्या दारी योजनांमधील प्रधान मंत्री आवास योजना ((शहरी), नागरी आरोग्यासंबंधी क्षयरोग डीबीटी योजना, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (ई-कार्ड). आभा कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत, गोल्डन कार्ड, शैक्षणिक संदर्भात २५% विद्यार्थी कोटा प्रवेश, वैयक्तिक शौचालय बांधकाम करणे नवीन परवाना देण, परवाना नुतनीकरण, परवाना हस्तांस्तरण, परवाना दुय्यम प्रत व्यवसायाचे नांव बदलणे, व्यवसाय बदलणे, विवाह नोंदणी नोंदणी प्रमाणपत्र, नवीन नळ जोडणी, प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, एनयूएलएम अंतर्गत बचतगट स्थापना स्वयंरोजगार जन्म-मृत्यु दाखला इ. सेवाबरोबरच राज्य लोकसेवा हक्कांतर्गत ऑनलाईन पध्दतीने दिल्या जाणा-या सेवांबाबतही सर्व विभागप्रमुखांनी व नियंत्रण अधिकारी यांनी जागृत राहून दोन्ही सेवांचा अंतर्भाव करून जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत पोहचविण्यांस सतर्कता ठेवावी. या सेवा नागरीकांना सुलभतेने आणि सहजतेने मिळाव्यात यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास नागरीकांना सेवाचा लाभ मिळणार आहे. त्यांनी पुढेही असे सांगितले की, नागरीकांसाठी शासन स्तरावर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांनी ‘महालाभार्थी हे पोर्टल तयार केलेले असून, या भिवंडी महापालिका स्तरावर मनपाच्या bncmc.gov.in या वेबसाईटवरही नागरिकांनी स्वतःची माहिती सादर केल्यानंतर कोणत्या शासकीय योजनांसाठी हा नागरिक पात्र ठरू शकेल याची एक संभाव्य यादी उपलब्ध होते. या प्रत्येक योजनेसाठी नागरिकाने कोठे संपर्क साधणे अपेक्षित आहे व आवश्यक कागदपत्रे कोणती, याचीही माहिती नागरिकांस मिळते. यामुळे नागरिकांना सहजपणे संबंधित योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आणि या सर्व सेवांचा लाभ जास्तीत जास्त देण्याच्यादृष्टीने संबंधितांनी विविध उपक्रमांविषयी मेळाव्यांमार्फत त्यांना तसे लाभ देऊन लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यास प्रयत्नशील रहावे असेही मार्गदर्शन करतांना शेवटी सांगितले. आढावा बैठकीस सहाय्यक आयुक्त (आरोग्य) प्रिती गाडे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) बाळाराम जाधव नगरसचिव तथा विधी अधिकारी अनिल प्रधान, प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, फैसल तातली सोमनाथ सोष्टे, गिरीष घोष्टेकर यांचेसह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -