घरठाणेठामपात मतदारांची संख्या लाखभराने वाढली

ठामपात मतदारांची संख्या लाखभराने वाढली

Subscribe

आकडा पोहचला १३ लाख ४६ हजारांवर

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत नवे तब्बल १ लाख १७ हजार मतदारांची वाढ झाल्याने २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा आकडा १३ लाख ४६ हजार इतका झाला आहे. हे मतदार प्रामुख्याने ठाणे शहर, मुंब्रा, कळवा आणि दिव्यात वाढलेले आहेत. या वाढलेल्या मतदारांमुळे निश्चितच राजकीय पक्षांचे टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिका हद्दीत १८ लाख ४१ हजार ४८१ इतकी लोकसंख्या नोंदवली गेली होती. तर आता ती लोकसंख्या जवळपास तीस लाखांच्या घरात पोहोचली आहे. २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२ लाख २८ हजार ६०२ इतक्या मतदारांची नोंद होती. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ६७ हजार ५०४ तर ५ लाख ६१ हजार ८७ इतक्या महिला मतदारांसह अवघे १५ अन्य मतदारांचा समावेश होता. मात्र कोरोना काळात जनगणना न झाल्याने यंदाची सार्वत्रिक निवडणूक ही २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे.

- Advertisement -

त्यातच दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदार नोंदणी मोठया प्रमाणात झाल्याचे दिसून आले. यामध्ये १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे नव्या मतदारांची संख्या १ लाख १७ हजार ३९४ इतकी महापालिका कार्यक्षेत्रात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर सदस्य संख्याही वाढल्याने प्रभागही वाढलेले आहेत. त्यातच नाव नोंदणी करणाऱ्या नव्या मतदारांमुळे राजकीय पक्षामधील नेतेमंडळींना निश्चित घाम फुटणार असल्याचे आता दिसू लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -