घरठाणेलोढा हेवनमधील त्या 240 कुटुंबांना मिळणार हक्काची घरे

लोढा हेवनमधील त्या 240 कुटुंबांना मिळणार हक्काची घरे

Subscribe

आपलं महानगरच्या वृत्ताची दखल

डोंबिवलीतील लोढा हेवन मधील शांती उपवन नावाची पाच इमारतींचे समूह असलेल्या पाच मजली इमारतीला शनिवारी सायंकाळी अचानक तडे गेले. स्लॅब देखील खचू लागला. त्यामुळे अवघ्या 22 वर्षात धोकादायक झालेल्या या इमारतीमधील तब्बल 240 कुटुंबांच्या डोक्यावरील छप्पर हरविले. त्यांच्या संसाराची एकप्रकारे होळी झाली व आयुष्यातील रंगाचा मात्र बेरंग झाला. याविषयी आपलं महानगरच्या वृत्ताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. रहिवाशांची मागणी मान्य करण्यात आली असून त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
शनिवारी शांती उपवन इमारतीला तडे जाताच जीवित हानी टाळण्यासाठी इमारती मधील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते.

रविवारी केडीएमसी प्रशासनाने ती धोकादायक इमारत पाडण्यासाठी सायंकाळी बुलडोझर आणि जेसीबी मागविला असता रहिवाशांनी पाडकाम कारवाईला विरोध करीत बुलडोझर अडविला. आधी आम्हांला विकासकाने घर देण्याची लेखी हमी द्यावी, नंतरच इमारतीचे पाडकाम करावे,अशी भूमिका घेतली. त्यानंतर कल्याण – शिळ रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते. सुमारे 22 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही अधिकृत इमारत 22 वर्षातच धोकादायक कशी झाली? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. याबाबत महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. ही इमारत पुन्हा नव्याने बांधून त्यात विस्थापित झालेल्या 240 रहिवाशांना त्यांची हक्काची घरे येत्या 3 वर्षात बांधून देण्याची आणि तो पर्यंत रहिवाशांना घरभाडे देण्याचे बिल्डरने कबूल केल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -