घरठाणेठाण्यातील रस्त्यांचे आर्थिक राजकारण, ५ वर्षात दीड हजार कोटींची उधळपट्टी

ठाण्यातील रस्त्यांचे आर्थिक राजकारण, ५ वर्षात दीड हजार कोटींची उधळपट्टी

Subscribe

पावसाळ्यात ठाणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि होणारे अपघात यामुळे पालिका दरवर्षी किरकोळ मलमपट्टी लावत कोट्यवधी रुपये खर्च करते. गेल्या पाच वर्षात ठाणे महापालिकेने रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी तब्बल दीड हजार कोटी रूपये खर्च झाल्याची बाब माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे. करोडो रुपये खर्चूनही ठाणेकर नागरिकांच्या नशीबी खराब रस्त्यांची समस्येचे लागलेले ग्रहण किती काही केले तरी सुटण्याचे नावच घेत नाही. यावरून ठाण्यात रस्त्यांच्या आर्थिक राजकारणात अनेकांची आर्थिकहीत गुंतले असल्याचा आरोप मनसेच्या जनहित व विधि विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केला आहे.

ठाणे शहरातील एकूण २८० किलोमीटरचे रस्ते आहेत. यामध्ये इतर प्राधिकरणाचे देखील रस्ते आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये या रस्त्यांवर पालिकेने दीड हजार कोटी खर्च केला असून या रस्त्यांमध्ये डांबरी रस्ते, युटी डब्ल्यूटी चे रस्ते आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अध्यादेशानुसार डांबरी रस्त्यांचे आर्युमान १५ वर्ष, काँक्रीट रस्त्यांचे ३०वर्ष आणि पुलाचे १०० वर्षांपर्यंत गृहीत धरून काम करावे असे असते अशा प्रकारे काम न केल्यास व नंतर प्रशासकीय मान्यता प्राप्त लांबीत खड्डे पडल्यास काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व संबंधीत पर्यवेक्षकीय अधिकारी यांची राहील. यावरून ठाण्यातील रस्त्यांबाबत पालिका संबंधीत कंत्रादारांवर किती मेहेरबान आहे हे समोर येते.

- Advertisement -

या रस्त्याचे काम केल्यानंतर त्या रस्त्यांची खराबी झाल्यास किंवा दुरूस्ती निघाल्यास ते काम करण्याची जबाबदारीही संपूर्ण ठेकेदाराची असते. ठाणे शहरातील गेल्या पाच वर्षात नूतनीकरण झाले आहेत. पण या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम ज्या कंत्रादारावर येते त्यांने ते केले नसल्यामुळे दरवर्षी पालिका करोडो रूपयांचे टेंडर काढून रस्त्यांची दुरूस्ती करत ठेकेदार आणि अधिकारी पालिकेच्या पैशांवर खिसा भरण्याचे काम करत असल्याचा आरोप मनसेच्या जनहित व विधि विभागाचे शहराध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केला आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराकडून कडून घेणे हे पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असूनही अधिकारी फक्त आपल्या टक्केवारीची घेण देणं करण्यासाठी करत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे.

ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांची भ्रष्ट युती

ठाण्यातील रस्त्यांच्या कामामध्ये सत्ताधारी पक्ष ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीमुळे रस्त्यांची काम ही निकृष्ट दर्जाची केली जात आहे. मनसे जनहित व विधि विभागाचे शहराध्यक्ष- स्वप्निल महिंद्रकर

- Advertisement -

ठाण्यातील रस्त्यांविषयी माहिती

ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या २०११ जनगणनेनुसार १८,००००० इतकी आहे. ठाणे शहराचे क्षेत्रफ़ळ १२१,८३ चौरस किलोमीटर तथा १२८२३ हेक्टर आहे. ठाणे शहरात ११ प्लानिंग सेक्टर असून ७४२.९७ हेक्टर जमीन रस्ते विकास प्लानिंग मधे येतात.

शहरातील रस्त्याची लांबी – २८०.०० कि.मी ७४२.९७ हेक्टर
ठाणे शहराचे उत्पन्न – ३९२०६ लाख
ठाणे शहराचा वार्षिक खर्च – ३०३९९ लाख

पाच वर्षात रस्त्यांवर झालेला खर्च

वर्ष                         खर्च
२०१५-१६     १६७ कोटी७७ लाख ४८ हजार १५५
२०१६-१७    १४९ कोटी ९८लाख १५ हजार १९२
२०१७ -१८   २२४ कोटी ३७ लाख १० हजार ०५८
२०१८-१९    २५१ कोटी ९६ लाख ४६ हजार०८९
२०१९-२०    ४१३ कोटी १३ लाख ६१ हजार ७१७
२०२०-२१    ११४ कोटी २५ लाख २५ हजार ८४७
…………………………………………………………..
एकूण –      १३२१ कोटी ४८ लाख०७ हजार ०५८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -