घरठाणेउल्हासनगरात दोनशे बेडचे अद्यायावत रुग्णालय सेवेसाठी तयार

उल्हासनगरात दोनशे बेडचे अद्यायावत रुग्णालय सेवेसाठी तयार

Subscribe

नव्या कोविड रुग्णालयाची खासदारांनी केली पाहणी

उल्हासनगर महापालिकेच्या रिजेन्सी निर्माणने हस्तांतरित केलेल्या चार मजली इमारतीत महापालिकेचे 200 बेडचे रुग्णालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह केली.

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या म्हारल गाव समोरील रिजेन्सी निर्माण कंपनीने चार मजल्याची इमारत आरक्षण विकसित करून हस्तांतरीत केली आहे. या इमारतीचे क्षेत्र 12 हजार चौरस फुटाच्या घरात आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर औषधांचे दुकान, शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपरेशन थिएटर, पहिल्या मजल्यावर 30 खाटांचे आयसीयू सेंटर, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर 170 खाटांचे सर्वसाधारण युनिट विकसित करण्यात आले आहे. तसेच कोविड विचारात घेऊन सहा हजार किलो लिटरचा ऑक्सिजन टॅंक उभारण्यात आला आहे. त्याची वाहिनी टाकण्यात आली आहे. तसेच 200 जम्बो सिलिंडर नैसर्गिक रित्या भरण्यासाठी हवेतून ऑक्सिजन घेऊन सिलेंडर भरण्यासाठी प्लांट उभारण्यात आला आहे. ह्या इमारतीत 40 किलोव्हॅट क्षमतेचा सोलर प्लांट बसविब्यात आला आहे. तसेच अग्निशामक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात असतानाच उल्हासनगर महापालिकेच्या स्व मालकीच्या रुग्णालयाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. या रुग्णालयाच्या कामाचे सोमवारी सायंकाळी खासदार श्रीकांत शिंदे, महापौर लिलाबाई आशान, नगरसेवक राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, कलवंतसिंग सोहता, राजेंद्रसिंग भुल्लर, चंद्रकांत बोडारे, स्वप्निल बागुल आदींनी पाहणी केली. यावेळी उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे, वैदयकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव, आरोग्य अधिकारी दिलीप पगारे, मुख्य शहर अभियंता महेश सितलानी आदी पालिका अधिकारी उपस्थित होते.

नामांकित डाॅक्टरांची नेमणूक
उल्हासनगर शहर कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार झाली आहे. हे रुग्णालय कोविड संपल्यावर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय म्हणून विकसित करण्यात येईल. या रुग्णालयात अद्यावत्त ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एनआयसीयू या सेवांसह नामांकित डॉक्टरांची नेमणूक करून शहरवासीयांना सेवा देण्यात येईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी दौऱ्यानंतर दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -