घरठाणेठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; २४ कुटुंबांचे स्थलांतर

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; २४ कुटुंबांचे स्थलांतर

Subscribe

उल्हासनगरप्रमाणे ठाण्यात देखील इमारतीचा स्लॅब कोसळण्याची पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. ठाण्याच्या राबोडीत रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास खत्री अपार्टमेंटमधील सी विंग या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून स्लॅब कोसळून तो थेट तळ मजल्यावर आला. या दुर्घटनेत रमिज शेख (३२) आणि गॉस तांबोळी (४०) या दोघांचा मृत्यू झाला असून अरमान तांबोळी (१४) हा जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर त्या इमारतीच्या २४ खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. स्लॅब पडला त्यावेळी तिघे त्या स्लॅबच्या खाली दबले गेले होते. त्यांना ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. जखमी अरमान याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असून ठाण्यात या दोन दिवसात पडझडीच्या घटनाही घडलेल्या आहेत. राबोडी परिसरात खत्री अपार्टमेंट ही २५ वर्ष जुनी इमारत असून आज पहाटे ६ च्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या अश्फाक वागनी यांचा पूर्ण स्लॅब हा तळ मजल्यावर कोसळला.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन हे विभाग घटनास्थळी दाखल झाले.तीन जण या स्लॅबखाली दबले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित रेस्क्यू ऑपरेशन करून या तिघांना बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. त्या तिघांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. खत्री अपार्टमेंट ही २५ वर्ष जुनी इमारत असून धोकादायक झालेल्या सी विंग मधील २४ खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. या सर्व कुटुंबातील लोकांचे जवळच्या खांदेशी मस्जिदमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. अशी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


साकीनाका बलात्काराचा तपास करणाऱ्या डॅशिंग एसीपी जोत्स्ना रासम आहेत तरी कोण?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -