घरट्रेंडिंगअ‍ॅरेंज मॅरेजला होकार देण्याआधी जोडीदाराला 'हे' प्रश्न नक्की विचारा, नाहीतर होईल मनस्ताप

अ‍ॅरेंज मॅरेजला होकार देण्याआधी जोडीदाराला ‘हे’ प्रश्न नक्की विचारा, नाहीतर होईल मनस्ताप

Subscribe

भारतात लग्न करताना अ‍ॅरेंज मॅरेजला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते.कॉलेजमध्ये जरी प्रेम केले असेल कींवा कितीही डेटिंग केले असेल तरीही भारतात जास्त करुन घरच्यांच्याच पसंतीने लग्न केले जाते.या अॅरेंज मॅरेजमध्ये वधू-वराची भेट ही कुटूंबाने ठरवल्याप्रमाणेच होते.मात्र हल्लीच्या पिढीला या सर्व गोष्टी जरा विचित्रच वाटतात.मात्र जशा गोष्टी पुढे निघून जातात तसं अनेक गोष्टी समजण्यास सुरुवात होते.लग्नासाठी पार्टनर शोधताना मुलगा असो वा मुलगी दोघेही आपल्या जोडीदाराच्या घरच्यांबाबत कींवा करिअरबाबतच चर्चा करतात. मात्र एखादे लग्नाचे नाते जुळवताना किंवा आपला जोडीदार निवडताना काही छोट्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. बोहल्यावर चढण्याआधी आपल्या जोडीदाराला हे प्रश्न विचारा नाहीतर, तुमच्यावरही लग्नानंतर मनस्ताप सहन करण्याची वेळ येईल.

दोघांनी फायनेंशिअल कम्पैटबिलिटीवर बोलणे गरजेचे

आपण नेहमीच ऐकत असतो की, कोणत्याही गोष्टीचं सोंग आणणं अगदी सोपं असतं मात्र,पैशाचं सोंग कोणालाही आणता येत नाही. त्यामुळे एखादे नाते टिकवण्यासाठी भावनांची गरज असतेच. मात्र या महागाईच्या जगात प्रॅक्टिकली पाहायला गेलो तर,भावनांइतकी संसाराचा गाडा योग्यरित्या चालवण्यासाठी पैशाचीही तितकीच आवश्यकता असते.त्यामुळे आर्थिक खर्चाबाबत एकमेकांशी खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे. जसे की,तुम्ही तुमच्या दोघांच्याही सॅलरीचा कश्याप्रकारे वापर करणार, आलेला पगार स्वत:साठी वापरणार की, एकाची सॅलरी सेविंगसाठी आणि एकाची खर्चासाठी असं करणार,तसंच तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही तुमचा पगार माहेर आणि सासर या दोन्ही ठिकाणच्या खर्चासाठी वापरणार का ? यावर खुलेपणाने आपल्या जोडीदाराशी चर्चा करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

जोडीदाराच्या भूतकाळाविषयीही जाणून घ्या

याशिवाय आपल्या जोडीदाराच्या भूतकाळातील गोष्टींबाबत आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कारण लग्नानंतर काही गोष्टी अचानक समोर आल्या की, त्याचा परिणाम त्या दोघांच्या नात्यावर होऊ शकतो. त्यामुळे जर या एकमेकांबाबतच्या गोष्टी एकमेकांशी बोलून स्पष्ट केल्या नाही तर लग्न तुटू शकते कींवा तुमचा घटस्फोटही होऊ शकतो.त्यामुळे कुठलंही नातं टिकण्यासाठी खुलेपणाने संवाद असणे गरजेचे आहे.

घरातील कामावरही बोलू काही

लग्नानंतर अनेक कुटूंबांची अशी इच्छा असते की, महिलांनीच घर सांभाळावं, घरातली कामं करावी.मात्र, हल्लीच्या स्त्रिया या सक्षम स्त्रिया आहेत. त्यामुळे या घरातील कामांच्या जबाबदारीबाबत एकमेकांशी खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे. जेणेकरुन,सर्व गोष्टी स्पष्ट होऊन तुमच्या संसाराची घडी व्यवस्थित बसेल.

- Advertisement -

हे ही वाचा – Voting : बायकोचा फोटो Whatsapp स्टेटसवर ठेवणं पडलं महागात ; नवऱ्यावर गुन्हा दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -