घरट्रेंडिंगस्टेजवर भाजप नेत्याचा अश्लील डान्स; व्हिडिओ व्हायरल

स्टेजवर भाजप नेत्याचा अश्लील डान्स; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सोशल मीडियावर टाकलेली कोणतीही पोस्ट असो किंवा व्हिडिओ असो व्हायरल होण्यास काही क्षण पुरेसा ठरतो. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका प्रोफेशनल डान्सरसोबत अश्लील नृत्य करताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अश्लील नृत्य करणारा व्यक्ती राजस्थानमधील भाजप नेत्याचा असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तसेच हा व्हिडिओ चित्तोडगड जिल्ह्याच्या मांगरोल क्षेत्रातील एका लग्न समारंभातील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये कैलास गुर्जर हे एका महिलेसह अश्लील नृत्य करताना दिसताय. हा व्हायरल होणारा व्हिडिओ २३ जानेवारीचा असला तरी तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

- Advertisement -

या प्रकाराविषयी भाजप नेता कैलास गुर्जर यांनी स्पष्टीकरण देताना असे सांगितले की, ते त्यांच्या कुटुंबासह एका लग्न सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी गेले होते. मात्र याबाबतचा खुलासा करताना ते म्हणाले, ‘मी माझ्या परिवारासह एका कौटुंबिक विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कोणीतरी माझ्या राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी हा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल केला’

हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी भाजप नेत्याला चांगलेच ट्रोल केले आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसतोय. तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं आहे. कैलास गुर्जर, प्रतापगड जिल्ह्यातील एका विभागातील भाजपा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष असल्याचेही सांगितले जात आहे. २८ जानेवारी रोजी तेथील निवडणुकांसाठी मतदान होणार असून हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -