घरट्रेंडिंगCRPF AC Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून सहाय्यक कमांडंट पदासाठी भरती

CRPF AC Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून सहाय्यक कमांडंट पदासाठी भरती

Subscribe

सीआरपीएफ सहाय्यक कमांडंट भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाने (CRPF) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भरती योजनेनुसार सहाय्यक कमांडंटच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
सीआरपीएफने जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, सिव्हिल/इंजीनिअर ट्रेडमधील ७व्या सीपीसीच्या लेव्हल १० (५६,१०० ते रु १ लाख ७७ हजार ५००) वर एकूण २५ पदे भरती केली जाणार आहेत, त्यापैकी १३ पदे अनारक्षित प्रवर्गात ठेवली आहेत. तर ओबीसी उमेदवारांसाठी ६ पदं, एससीसाठी ३, एसटीसाठी ३ पदे, एसटीसाठी १ आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी २ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.

असा करा अर्ज

या पदांसाठी इच्छुक उमेदवार सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइट, crpf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे तुम्ही अर्ज करू शकतील. सीआरपीएफ सहाय्यक कमांडंट भरती २०२१ साठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ३० जूनपासून सुरू होणार असून २९ जुलै २०२१ पर्यंत उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे, जे ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये संपूर्ण सवलत देण्यात आली आहे.

- Advertisement -

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पास केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच, उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार ३५ वर्षांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याची तरतूद आहे. अधिक माहितीसाठी भरती केलेली अधिसूचना तुम्ही पाहू शकतात. सीआरपीएफ सहाय्यक कमांडंट भरती २०२१ नुसार, शारीरिक निवड (पीएसटी), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीएसटी) आणि लेखी चाचणी, दस्तऐवज तपासणी आणि वैद्यकीय चाचणी (डीएमई) च्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.


JEE Main 2021: ‘जेईई मेन’ची परीक्षा १७ जुलैला होणार; १४ ऑगस्टपर्यंत निकाल लागणार
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -