‘आफ्रिकेने’ जिंकला वर्ल्डकप! या ट्वीटमुळे अमिताभ झाले ट्रोल

फिफा वर्ल्डकप जिंकल्याप्रकरणी शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन यांनी, ट्वीटमध्ये फ्रान्सऐवजी चुकून 'आफ्रिकेला' शुभेच्छा दिल्या. यावर जगभरातील फुटबॉल प्रेमींनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

amitabh twitt on fifa final
सौजन्य- timesnownews

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं खेळाविषयीचं प्रेम जगजाहीर आहे. अमिताभ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी आपलं क्रीडाप्रेम व्यक्तही केलं आहे. रविवारी झालेला FIFA वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अमिताभ त्यांच्या कुटुंबियांसमवेत थेट रुसला गेले होते. या सामन्यामध्ये फ्रान्सने क्रोएशिआला हरवत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. FIFA मधील विजयामुळे फ्रान्स संघाचे जगभरातून कौतुक झाले. अमिताभ यांनीही ट्वीटर अकाउंटवरुन विजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छांचं ट्वीट करतेवेळी अमिताभ यांच्याकडून छोटीशी चूक झाली. बहुधा उत्साहाच्या भरात झालेल्या त्या एका चुकीमुळे सध्या अमिताभ सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. नेटिझन्सनी आणि विशेषत: फुटबॉल प्रेमींनी अमिताभना फैलावर घेतले आहे.

देशाचं नावच बदललं

फ्रान्सला वर्ल्डकप जिंकल्याबद्दल शुभेच्छा देत असताना अमिताभ यांनी ट्विटर लिहीले, ‘ये बात… आफ्रिकेने वर्ल्डकप २०१८ जिंकला.’ थोडक्यात अमिताभ बच्चन यांनी फ्रान्सऐवजी चक्क आफ्रिकेला शुभेच्छा दिल्या. अमिताभ यांनी ट्वीटरमध्ये थेट देशाचं नावच बदलून टाकल्यामुळे फुटबॉल प्रेमींनी त्यांची नाराजी व्यक्त केली. जगभरातून अमिताभ यांच्या या चुकीची खिल्ली उडवत या ट्वीटला ‘संकुचित मानसिकता’ असं हिणवलं आहे. अमिताभ यांच्या या ट्वीटवर या ट्वीटवर रिप्लाय देत एका फॉलोअरने म्हटलं आहे की, ‘भलेही फ्रान्सच्या टीमचे खेळाडू मूळचे आफ्रिकन असतील. पण म्हणून वर्ल्डकप जिंकल्याप्रकरणी फ्रान्सऐवजी आफ्रिकेला श्रेय देणं योग्य नाही.’