घरमुंबई...आणि ट्रेनखाली जाता जाता वाचला

…आणि ट्रेनखाली जाता जाता वाचला

Subscribe

वारंवार रेल्वेकडून चालत्या ट्रेनमध्ये चढू नका, अशा सूचना केल्या जातात. पण त्याकडे लक्ष न देता प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात.

चालत्या ट्रेनमध्ये चढू नका, असे अनेकदा सांगूनही चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा पराक्रम अनेकजण करतात. शनिवारी देखील एक तरुण ट्रेनखाली जाता जाता थोडक्यात बचावला आहे. पनवेल स्थानकावर हा प्रकार घडला आहे. एक प्रवासी चालती ट्रेन पकडायला गेला आणि त्याचा तोल गेला. पण ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे त्या प्रवाशाचे प्राण वाचले. विशेष म्हणजे हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

पनवेलच्या फलाटक्रमांक ७ वरुन पनवेल- नांदेड एक्सप्रेस नुकतीच सुटली होती. रवी बाळू (२५) या ट्रेनमधून परभणी पर्यंतचा प्रवास करायचा होता. पण त्याला फलाटावर पोहोचायला उशीर झाला. ही एक्सप्रेस पकडत असताना त्याचा तोल गेला. त्याचे अर्धे शरीर फलाटावर फरफटत होते. ट्रेन आणि फलाटामधल्या फटीत तो पडणार इतक्यात आरपीएफ कॉन्स्टेबल विनोद शिंदे यांनी रवीला खेचले आणि त्याचे प्राण वाचवले. सीसीटीव्हीमध्ये कॉन्स्टेबल विनोद शिंदे रवीला वाचवताना दिसत आहेत.

- Advertisement -

जीवापेक्षा ट्रेन महत्त्वाची का?

वारंवार रेल्वेकडून चालत्या ट्रेनमध्ये चढू नका, अशा सूचना केल्या जातात. पण त्याकडे लक्ष न देता प्रवासी आपला जीव धोक्यात घालतात. अगदी काहीच दिवसांपूर्वी बोरीवली स्थानकात एका महिलेचा ट्रेन पकडताना ट्रॅकखाली येऊन मृत्यू झाला. शिवाय क्षुल्लक कारणामुळे असे अपघात रेल्वे प्रवासात होत असतात, हे अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे प्रवासादरम्यान वेळ वाचवण्यासाठी ट्रॅक ओलांडणे, चालत्या गाडीत चढणे, जीवघेणे स्टंट करणे टाळले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -