घरट्रेंडिंगतुमची महत्त्वाची 'ही' कामे ३१ डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ; नाहीतर भरावा लागेल...

तुमची महत्त्वाची ‘ही’ कामे ३१ डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ; नाहीतर भरावा लागेल दंड

Subscribe

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. २०२१ हे वर्ष संपण्याअगोदर तुम्ही तुमची महत्त्वाची कामे उरकून घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत तुमची महत्त्वाची कामे केली नाही तर, तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. तर, जाणून घ्या तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे उरकून घ्यायची आहेत त्याबाबत.

आधारकार्ड – UAN लिंक

UAN ला आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सदस्यांना UAN क्रमांक आधारकार्डशी जोडणे अनिवार्य आहे.EPFO मेंबरसाठी हे आधारकार्ड लिंक करणे गरजेचे असून, लिंक न केल्यास तुमचे पीएफ खाते बंद होऊ शकते.

- Advertisement -

कमी व्याजावर मिळणार होम लोन

जर तुम्ही बॅंक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर, तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्ज घेऊ शकता. बॅंक ऑफ बडोदाने गृहकर्जाचा दर ६.५० टक्क्यांनूी कमी केला असून,हे फक्त ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध असेल.

तुमच्या हयातीचा दाखला

पेशन्सधारकांनी हयातीचा दाखला ३१ डिसेंबरपर्यंच सादर न केल्यास मिळणारे निवृत्ती वेतन बंद होऊ शकते.पेन्शनधारकांना त्यांच्या हयातीचा दाखला हा ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावा लागतो. मात्र, ह्यावेळेस या दाखल्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

ट्रेडिंग,डीमॅट अकाउंटचे KYC

सिक्युरिटीज अँण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने ट्रेडिंग आणि डीमॅट खात्यांचे केवायसी करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Income Tax Return फायलिंग

सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांनी त्यांचा ITR रिटर्न ३१ डिसेंबरपर्यंत न भरल्यास दंड भरावा लागेल.


हे ही वाचा – 10 Years of Don 2: डॉन २च्या शुटींगवेळी शाहरुखने दाबला होता प्रियंकाचा गळा


 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -