घरट्रेंडिंगपाहा व्हिडिओ! शॉपिंग मॉलमध्ये भल्यामोठ्या सरड्याने घातला धुमाकूळ

पाहा व्हिडिओ! शॉपिंग मॉलमध्ये भल्यामोठ्या सरड्याने घातला धुमाकूळ

Subscribe

आपण अनेकदा अनिमेटेड चित्रपटांमध्ये किंवा कार्टुन्समध्ये अंगावर शहारे आणणारे महाकाय हिंस्रक प्राणी पाहिलेत. पण थायलँडमधील एका दुकानात खराखुरा असा भला मोठा हिंस्रक प्राणी पाहायला मिळाला आहे. हा हिंस्रक प्राणी म्हणजे भलामोठा असा सरडा आहे. या सरड्याला पाहून दुकानातील ग्राहकांची चांगलीच तंतरली होती. सध्या सोशल मीडियावर या भल्यामोठ्या सरपटणाऱ्या सरड्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

थाललँडमधील ७ इलेव्हन आउटलेटमधील हा व्हिडिओ आहे. यामध्ये हा महाकाय सरडा दुकानातील कपाटावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या कपाटावर चढण्याच्या प्रयत्नात त्याने सर्व सामान खाली पाडून मोठे नुकसान केले. हा व्हिडिओ थाई ट्रॅव्हल एजेन्सी मुंडो नोमादा (Thai travel agency Mundo Nomada) यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये महाकाय सरडा अखेर कपाटाच्या टोकावर जाऊन बसतो. यादरम्यान खूप वेळ कपा़टावरील सामानावर बसत सगळे सामान खाली पाडतो व आपली भलीमोठी जीभ आत बाहेर करत असतो. यावेळी दुकानात खरेदीसाठी आलेले ग्राहक या सरड्याला पाहून घाबरतात. हे घाबरलेले ग्राहक लांब राहून मोठमोठ्याने आरडाओरडा करत त्याला हटवण्याची मागणी करत आहेत. तर स्टोरमधील काही लोक व्हिडिओ करीत होते. त्यामुळे इंटरनेटवर हा व्हिडिओ अगदी काही सेकंदात व्हायरल झाला. या व्हिडिओला १ मिलियनहून अधिक युजर्सने आत्तापर्यंत पाहिले आहे. त्यानंतर फेसबुक आणि ट्विटरवरही हा व्हिडिओ अधिक शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक युजर्स भन्नाट, मजेशीर कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

ไม่ว่าจะสูง แค่ไหนก็ไปถึง😂 อากาศร้อนขอหนูตากแอร์หน่อยงับ5555555555555555555555555555555555555

งื้อต้าวทุกท่านที่สนใจคลิบ/ภาพ ติดต่อได้ที่ [email protected] (For licensing contact)เลยนะง้าบบบบงื้อออ

Posted by Jejene Narumpa on Tuesday, 6 April 2021

थाई ट्रॅव्हल एजेन्सी मुंडो नोमादाबाबत माहिती देताना सांगितले की, बँकॉक आणि थायलँडजवळील अनेक शहरांमध्ये असे मोठ्या आकाराचे सरपटणारे प्राणी पाहयाला मिळतात. तसेच येथील मार्केटमध्येही या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मांसाची विक्री केली जाते. याआधीही अनेकदा थायलँडमध्ये असे भले मोठे सरपटणारे प्राणी पाहायला मिळाले. बँकॉकमधील लुंपीमी पार्कमध्ये २०१६ साली असा भला मोठा सरपडणारा सरडा दिसला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -