घरट्रेंडिंगबाब्बो! 'या' देशात कर्जबुडव्यांच्या 'अंडरवेअर'चाही होतोय लिलाव!

बाब्बो! ‘या’ देशात कर्जबुडव्यांच्या ‘अंडरवेअर’चाही होतोय लिलाव!

Subscribe

गायी-मेंढ्यांचाही होतोय लिलाव

आपल्या गरजा, आवडी-निवडींसह शौक पूर्ण करण्यासाठी अनेक जण कर्ज काढतात. मात्र असे काही लोक आहेत की जे आपले कर्ज फेडत नाहीत. एकदा कर्ज काढले की त्याची परतफेड न करता फरार झाल्याचे कित्येक किस्से ऐकायला मिळतात. मात्र अशा कर्जबुडव्या लोकांसाठी युक्रेनने असा अनोखा मार्ग निवडला आहे की तुम्ही देखील ऐकून हैराण व्हाल… काढलेल्या कर्जाची रक्कम भरू न शकलेल्या कर्जबुडव्यांच्या अंडरवेअरचा देखील लिलाव येथे करण्यात येतो.BBC ने दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकाराची जाहीरात सेंट्रल सिटी Kryvyi Rih मधील न्याय मंत्रालयाच्या वेबसाइटवर लिलावासाठी ठेवण्यात आल्याचे दिसते. यामध्ये लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या अंडरवेअरच्या लिलावाची किंमत 19.4 hryvnia (50 रुपये) आहे.

गायी-मेंढ्यांचाही होतोय लिलाव

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कर्ज बुडव्या लोकांकडे असणाऱ्या पाळीव प्राण्यांचा देखील येथे लिलाव करण्यात येतो, जसे की, गायी, मेढ्यांसारखे प्राणी कर्ज बुडवणाऱ्या लोकांकडे असतील तर ते घेऊन त्यांचाही लिलाव करण्याचा निर्णय या देशाने घेतला आहे. कोरोना दरम्यान, युक्रेनमध्ये कर्जबुडव्या लोकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गेल्या वर्षी या संदर्भात एक प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. ज्यावेळी दोन कुत्र्यांनाच विकण्यासाठी जाहीरात देण्यात आली होती.

- Advertisement -

काही सामान दान ही केले जाते

हा निर्णय २०१५ साली युक्रेनमध्ये लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ३६५ मिलियन यूरो पर्यंतची संपत्ती देखील विकली होती. सरकारचे कर्ज फेडू न शकणाऱ्या लोकांचे सामान विकले जाते. कित्येकदा युक्रेनमधील कर्ज बुडवणाऱ्या लोकांचे सामान, वस्तू अनाथालय, आश्रम आणि शाळेत देखील दान म्हणून दिले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -