घरCORONA UPDATELockdown Story: मुलांना खेळताना पाहून कुत्रा बसला रुसून; फोटो होतोय व्हायरल

Lockdown Story: मुलांना खेळताना पाहून कुत्रा बसला रुसून; फोटो होतोय व्हायरल

Subscribe

एका बुलडॉग जातीच्या कुत्र्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत हा बुलडॉग कुत्रा खूपच निराश दिसतोय. या फोटोला ट्विटरवर रशिदा ऐली नामक युजरने शेअर केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बिग पोपा आज खूप दुःखी आहे. कारण बाहेर खेळत असलेल्या मुलांसोबत त्याला खेळता येत नाहीये. लॉकडाऊन असल्यामुळे तो केवळ बाल्कनीत बसून इतरांना खेळताना बघतोय.”

- Advertisement -

कोरोना व्हायरसमुळे सध्या संपुर्ण जग लॉकडाऊन झालेले आहे. या लॉकडाऊनचा फटका जसा मजूरांना, छोट्या व्यापाऱ्यांना बसला आहे. तसा तो लहान मुले आणि प्राण्यांनाही बसला आहे. लहान मुलांना बाहेर खेळायला जाता येत नाही. प्राण्यांनाही बाहेर फिरण्याच्या ऐवजी लॉकडाऊन व्हावे लागले आहे. अशातच ऐलीने हा एक सुंदर फोटो ट्विट केला आहे. “लॉकडाऊनमुळे बिग पोपा बाहेर जाऊन शकत नाही. बाहेर तो आपल्या छोट्या मित्रांसोबत खेळूही शकत नाही. यामुळे तो खुप दुःखी झालेला आहे. बाल्कनीत बसून बिग पोपा खूप भुंकतोय. मात्र कुणीही त्याकडे लक्ष देत नाहीये. म्हणून तो उदास होऊन बसलाय.”, असे कॅप्शन ऐलीने लिहिले आहे.

एका मुक्या जनावराच्या या भावना लॉकडाऊनमध्ये फसलेल्या प्रत्येक माणसाला स्वतःशी कनेक्ट करते. या बुलडॉगच्या फोटोला इंटरनेटवर चांगलीच पसंती मिळत आहे. गेम ऑफ थ्रोन्समधील लोकप्रिय पात्र खलिसीनेही या फोटोवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या ट्विटला आतापर्यंत ६४ हजार रिट्विट मिळाले असून ६ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच हजारो लोकांनी या फोटोवर कमेंट केली आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -