घरट्रेंडिंगचाहत्यांसाठी महेंद्रसिंह धोनी धोकादायक; सनी लिओनेपासूनही सावध राहा!

चाहत्यांसाठी महेंद्रसिंह धोनी धोकादायक; सनी लिओनेपासूनही सावध राहा!

Subscribe

धोनी, सनी लिओने, राधिका आपटे ठरणार चाहत्यांसाठी धोकादायक!

बातमीचं शिर्षक वाचून काहींना धक्का तर काहींना आश्चर्य वाटलं असेल. काही कट्टर चाहत्यांना राग देखील आला असेल. पण हे खरं आहे. भारताचा माजी कर्णधान महेंद्रसिंह धोनी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सनी लिओने, पॉप गायक बादशाह, बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे, अभिनेत्री श्रद्धा कपूर असे काही काही सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसाठी धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. शास्त्रीय पद्धतीचा आधार घेऊन तयार करण्यात आलेल्या या यादीमध्ये अनेक भारतीय दिग्गजांचा समावेश आहे. यांच्या नुसत्या नावांमुळेच त्यांच्या चाहत्यांना धोका निर्माण होऊ शकतो. मॅकएफीने नुकतीच चाहत्यांसाठी धोकादायक अशा सेलिब्रिटींची यादीच जाहीर केली आहे!

सनी लिओनेचं नाव देखील पडणार महागात!

आता तुम्ही म्हणाल, की या सेलिब्रिटींची नावं कशी काय त्यांच्या चाहत्यांसाठी धोकादायक ठरू शकतात? तर त्यांची नावंच तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहेत. मॅकएफीने जाहीर केलेल्या यादीनुसार यात सर्वात पहिल्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी आहे. त्याच्या खालोखाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याच्यानंत बिग बॉस विजेता गौतम गुलाटीचा क्रमांक लागतो. याच यादीमध्ये अभिनेत्री राधिका आपटे सहाव्या स्थानावर, श्रद्धा कपूर सातव्या स्थानावर, महिला हॉकीपटू हरमनप्रीत कौर आठव्या स्थानाव, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू नवव्या स्थानावर तर फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो दहाव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

सेलिब्रिटींची यादीच जाहीर

इंटरनेट सर्चमध्ये आपल्या आवडत्या सेलिब्रिटीविषयीची माहिती आपण सगळेच शोधतो. पण काही विशिष्ट गोष्टी सर्च केल्यामुळे आपल्या डिव्हाईसवर व्हायरसचा हल्ला होऊ शकतो. यातून तुमची वैयक्तिक माहिती, तुमचे पासवर्ड चोरीला जाऊ शकतात. त्याहून गंभीर म्हणजे तुमच्या माहितीचा वापर गैरकृत्य करण्यासाठी केला जाऊ शकतो. इंटरनेटवर सर्च करताना ज्यामुळे व्हायरसचा हल्ला होऊ शकतो, अशा सेलिब्रिटींची यादी मॅकअफीने जारी केली आहे. त्यांच्या २०१९च्या यादीमध्ये व्हायरसचा हल्ला होण्याचा सर्वाधिक धोका महेंद्रसिंह धोनीच्या नावाने सर्च केल्यामुळे असल्याचं मॅकअफीचं म्हणणं आहे.

कसा होतो व्हायरस हल्ला?

‘आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी संबंधित ओरिजनल कंटेंट बरेच कमी लोकं घेतात. पण अशा सेलिब्रिटिंचा पायरेटेड कंटेंट म्हणजेच स्पोर्ट्स इव्हेंट, चित्रपट, टीव्ही शो, फोटो इंटरनेटवर सर्च केले जातात. त्यांचा वापर केला जातो. पण हा कंटेंट वापरताना हे लक्षात घेतलं जात नाही, की हा कंटेंट पुरवणाऱ्या वेबसाईट त्याबदल्यात तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात’, अशी माहिती मॅकअफीचे उपसंचालक वेंकट कृष्णपूर यांनी दिली आहे. त्यामुळेच सर्वच इंटरनेट वापरकर्त्यांनी कोणत्याही फोटोवर किंवा व्हिडिओवर क्लिक करण्यापूर्वी त्यातून होणाऱ्या संभाव्या धोक्याचा देखील विचार करावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.


हेही वाचा – ‘नशीब हे बलात्कारासारखं असतं’; काँग्रेस खासदाराच्या पत्नीची पोस्ट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -