घरट्रेंडिंगखतम! "अपुन लिखेगा नही साला'', दहावीच्या विद्यार्थ्यावर 'पुष्पा फिव्हर'; उत्तरपत्रिकेत लिहून आला...

खतम! “अपुन लिखेगा नही साला”, दहावीच्या विद्यार्थ्यावर ‘पुष्पा फिव्हर’; उत्तरपत्रिकेत लिहून आला फक्त डायलॉग

Subscribe

दहावीची परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. पण अनेकदा अभ्यास न झाल्याने विद्यार्थी परीक्षेत कॉपी करतात , किंवा मनाला वाटेल ते लिहून येतात. मात्र काही विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी थेट चित्रपटातील गाणी किंवा डायलॉग लिहितात. अशाच एक दहावीचा विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत सिनेमाचा डायलॉग लिहिला आहे. ही उत्तर पत्रिका आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका पाहून शिक्षकही चक्रावले आहेत. सध्या या उत्तर पत्रिकेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगतेय.

अलीकडेच पुष्पा द राईज हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मीका मंदानाने यात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील ‘पुष्पराज मैं झुकेगा नही साला’ आणि ‘तेरी झकल अशर्फी’ हे डायलॉग आणि  गाणं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळाले, इन्स्टाग्रामवर देखील प्रत्येक जण अल्लू अर्जुनची डान्स स्टेप कॉपी करत रिल्स अपलोड करू लागले. मात्र रिल्समधील हे डायलॉग आता काही जण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही वापरू लागले आहेत. अशाचप्रकारे एका विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत चक्क पुष्पा फिल्मचा डायलॉग लिहिला आहे. हे पाहून पेपर तपासणारे देखील हैराण झालेत. विद्यार्थ्यावर पुष्पाचा असा फिव्हर चढला की, त्याने उत्तर पत्रिकेत अल्लू अर्जुनच्या, ‘पुष्पा…. पुष्पराज मैं झुकेगा नही साला’ हा डायलॉग अगदी हटके पद्धतीने लिहिला आहे. सोशल मीडियावर या उत्तरपत्रिकेच्या फोटोची पोस्ट व्हायरल होते आहे.

- Advertisement -

ज्यामध्ये विद्यार्थ्याने ‘पुष्पा… पुष्पराज… अपुन लिखेगा नहीं साला’ असं लिहिलं आहे. याशिवाय उत्तरपत्रिकेत दुसरं काहीच लिहिले नाही. ही घटना पश्चिम बंगालमधील असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी देखील उत्तरपत्रिकामध्ये चित्रपटाचे डायलॉग लिहिल्याचे समोर आले आहे. परंतु पुष्पाचा फिव्हर फॅन्सच्या डोक्यातून गेलेला नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -