घरगणपती उत्सव बातम्या'सेल्फी विथ बाप्पा' गणरायाच्या आठवणींचे डिजीटायजेशन

‘सेल्फी विथ बाप्पा’ गणरायाच्या आठवणींचे डिजीटायजेशन

Subscribe

बाप्पांसोबत फोटो घ्या आणि अपलोड करा थेट मायमहानगर.कॉमवर...

उद्यापासून (१३ सप्टेंबर) महाराष्ट्रात गणरायाच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात होत आहे. या दहा दिवसात प्रत्येकजण गणरायासोबतची आपली आठवण जपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या सेल्फी घेण्याची क्रेझ सर्वच वयोगटात दिसून येते. गणपती बाप्पांसोबतही आपण सेल्फी किंवा फोटो घेऊन बाप्पाला आठवणीत सेव्ह करण्याचा प्रयत्न करत असता. यासाठीच माय महानगर घेऊन आलंय ‘सेल्फी विथ बाप्पा’ उपक्रम. तुमच्या सेल्फींचे डिजीटायजेशन करण्यासाठी मायमहानगरने ‘सेल्फी विथ बाप्पा’ हा उपक्रम सुरु केला आहे.

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

- Advertisement -

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

 

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -