घरट्रेंडिंगऐकावं ते नवलंच! बेडकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबवली जाते 'या' देशात ट्राफिक

ऐकावं ते नवलंच! बेडकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबवली जाते ‘या’ देशात ट्राफिक

Subscribe

. असा एक देश आहे जिथं बेडकांना रस्ता ओलांडू देण्यासाठी चक्क ट्रॅफिक थांबवली जाते. तुम्हाला माहित आहे का त्या देशाविषयी...

सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्या देशाची हटके परंपरा (युनिक ट्रेडिशन) व्हायरल होताना दिसतेय. जे तुम्ही वाचलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. असा एक देश आहे जिथं बेडकांना रस्ता ओलांडू देण्यासाठी चक्क ट्रॅफिक थांबवली जाते. तुम्हाला माहित आहे का त्या देशाविषयी…

जर्मनीत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावर एक वेगळाच नजारा पाहायला मिळतो. येथे उन्हाळ्यात लोक चक्क आपली वाहतूक थांबवून बेडकांना रस्ता ओलांडायला मदत करतात.

- Advertisement -

जर्मनीतील बॉन शहरात बेडकं उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपल्या थंडीतील ठिकाणातून निघून रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे वाहतूक सुरु राहिल्यास यातील अनेक बेडकं गाडीखाली येऊन मरतात. कधी कधी तर रस्त्यावर शेकडो बेडक मृतावस्थेत दिसतात. त्यामुळे या शहरातील काही स्वयंसेवी संस्था या काळात बेडकांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात. याचाच भाग म्हणून ते बेडूक दिसलं की वाहतूक थांबवून या बेडकांना रस्त्यावरुन बाजूला करतात. तर या बेडकांना त्यांच्या ठिकाणांवर सुरक्षित पोहचवण्यासाठी आम्ही त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करतो. या कामात अनेक संस्थांचा सहभाग आहे, असे स्वयंसेवी संस्थाकडून सांगण्यात येत आले.

या शहरात रस्त्याच्या खाली भुयारं बनवण्यात आली आहेत. याचा उपयोग करुन बेडकं कधीही रस्ता पार करुन जातात. याशिवाय सरकारने संपूर्ण बॉन शहरात ८०० पेक्षा अधिक फेंसिंग तयार केल्या आहेत. त्यामुळे बेडकांचं गाडीखाली येण्याचं प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. रस्त्यावर जर बेडकं दिसली तर ती सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडली जातात. लहान रस्त्यांवर बेडकांसाठी वाहतूक देखील थांबवली जात असल्याचा नियमच पाळला जातो.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -