घरट्रेंडिंगऐकाव ते नवलच! Instagram फिल्टरसारखे दिसण्यासाठी केली २१ लाखांची सर्जरी

ऐकाव ते नवलच! Instagram फिल्टरसारखे दिसण्यासाठी केली २१ लाखांची सर्जरी

Subscribe

अनेक जण सुंदर आणि इतरांपेक्षा जरा हटके दिसण्यासाठी काही ना काही प्रयोग करत असतात. परंतु झटपट सुंदर रुप मिळवण्यासाठी अनेक जण नाक, डोळे, ओठ, चेहऱ्यावर प्लॉस्टिक सर्जरीला पसंती दर्शवतात. सेलिब्रिटी, मॉडेलसारखे दिसण्यासाठी अनेक हौशी महागडी प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. मात्र यूकेतील एका तरुणाने मॉडेल, सेलिब्रिटीसारखे नाही तर चक्क इंस्टाग्राम (Instagram Filter)सारखे दिसण्यासाठी चेहऱ्यावर अनेक प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतल्या आहेत. यासाठी या पट्याने तब्बल ३० हजार डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये २१ लाख रुपये खर्च केले आहेत.

इंस्टाग्रामवर क्लीअर स्कीन, स्मॉल फेस, लीप फिलर्स, मेकअप असे अनेक प्रकारचे फिल्टर आहेत. या फिल्टरमधील आवडीचा फिल्टर वापर आपण हवा तसा फोटो काढू शकतो. मात्र युकेतील १९ वर्षीय लेव्ही जेड मर्फी नाम तरुणाने प्रत्यक्षातही आवडत्या फिल्टरप्रमाणे दिसण्यासाठी चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. हा तरुण यूकेच्या मँचेस्टरमधील रहिवासी आहे. Instagram वरील आवडणाऱ्या फिल्टरप्रमाणे दिसण्यासाठी त्याने डोळ्यावर कॅट आय लिफ्ट, ओठांवर फिलर, हनुवटी, जबडा, नाकवरही शस्त्र क्रिया करुन घेतली. एवढेच नाहीतर त्याने दातही सरळ करुन घेतले.

- Advertisement -

आत्तापर्यंत त्याने आपल्या शरीरावर अनेक शस्त्रक्रिया करुन घेतल्या. या शस्त्रक्रियांविषयी लेव्ही सांगतो, मला माझा चेहरा आवडत नाही असे काही नाही पण मला कधी कधी माझ्या चेहऱ्याचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी सतत लुक बदलत असतो. त्याच्या या लूकवर अनेकांनी टीका केली पण या टीका मी मनावर घेत नाही, कारण माझा लूकला घेऊन मी खूप खूश आहे. असे लेव्ही म्हणतो. आपल्या हटके चेहऱ्यामुळे लेव्ही खूप प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया करून घेतल्यानंतर त्याची जाहिरात करण्यातून तो पैसा मिळवतो. यातून जाहिरांमधून मिळणाऱ्या पैशातून तो शस्त्रक्रिया करुवून घेतो. कमी खर्चात शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी त्याने खूप सर्च केले. यातून त्याने तुर्की देशाची निवड केली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -