घरट्रेंडिंगVideo: मावशीला १८०० रुपये मिळालेच पाहीजेत; नाहीतर मुख्यमंत्री राजीनामा द्या

Video: मावशीला १८०० रुपये मिळालेच पाहीजेत; नाहीतर मुख्यमंत्री राजीनामा द्या

Subscribe

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काहीच सांगू शकत नाही. आज सकाळपासून १८०० रुपयांच्या पगारावरुन वाद घालणारी मावशी आणि तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मावशीच्या समर्थनार्थ आता एक काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या काकांनी तर कहरच केला आहे. मावशीची फसवणूक झाली असून त्या मुलांची सीबीआय चौकशीची मागणी करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागण्यात आला आहे. व्हिडिओत बोलणारे हे महाशय कोण आहेत? याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

मावशीला १८०० रुपये मिळालेच पाहीजेत,CBI चौकशीची काकांची मागणी| 1800 Logic |Mavashi must get her money

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काहीच सांगू शकत नाही. आज सकाळपासून १८०० रुपयांच्या पगारावरुन वाद घालणारी मावशी आणि तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मावशीच्या समर्थनार्थ आता एक काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या काकांनी तर कहरच केला आहे. मावशीची फसवणूक झाली असून त्या मुलांची सीबीआय चौकशीची मागणी करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागण्यात आला आहे. बघा हा मजेशीर व्हायरल व्हिडिओ….

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, August 30, 2020

- Advertisement -

 

या व्हिडिओमध्ये औषधाच्या दुकानात बसलेला एक व्यक्ती मावशीच्या समर्थनार्थ जोरदार आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. त्या टवाळखोर युवकांनी मराठी असलेल्या मावशीची फसवणूक केलेली आहे. एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ लाख दिलेले नाहीत. त्यात हे तरुण मावशीच्या हक्काचे पैसे देत नाहीयेत, असा युक्तिवाद या महशयांनी केलेला आहे. त्यामुळेच या युवकांची सीबीआय चौकशी करावी, असे हे काका म्हणत आहेत. सुशांत प्रकरण ठाकरे सरकारला नीट हाताळता आलेले नाही. निदान या प्रकरणात तरी योग्य चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

आज सकाळपासून १८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या मावशीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. सकाळपासूनच अनेक व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर होत होता. या मावशी चांगल्याच ट्रेडिंगमध्ये आल्या होत्या. त्यानंतर या काकांचा व्हिडिओ आल्यामुळे अनेकांचा रविवार आज सार्थकी लागला.

अनेकांनी या मावशीचा व्हिडिओला चांगली दाद दिली असली तरी महिल व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी हा व्हिडिओ गंभीरतेने घेतला आहे. “मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे. या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत.” अशा आशयाची पोस्ट यशोमती ठाकूर यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान…

Posted by Adv. Yashomati Thakur on Sunday, August 30, 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -