घरमुंबईभाडोत्री कार्यकर्त्यांना अच्छे दिन

भाडोत्री कार्यकर्त्यांना अच्छे दिन

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम तब्बल १२ दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे भाडोत्री कार्यकर्त्यांचे बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भाडोत्री कार्यकत्यांची जमवाजमव सुरू झाली आहे. मंदीचे प्रचंड सावट असल्याने एका भाडोत्री कार्यकत्याला पाचशे रूपये असा दर ठरविण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक काळात भाडोत्री कार्यकत्यांना अच्छे दिन आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक पक्षाचे दिग्गज उमेदवार उतरले आहेत. सोमवारपासून तब्बल १२ दिवस प्रचाराची धामधूम राहणार आहे.

नक्की वाचा मानखुर्द शिवाजीनगरमधून रिपाईचे सोनावणे निवडणुकीतून घेणार माघार

- Advertisement -

मोठया प्रमाणात भाडोत्री कार्यकर्ते सहभागी

या दिवसात प्रत्येक उमेदवाराला प्रचारसभा, रॅली, रोड शो साठी जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. मात्र या सगळ्यांसाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने भाडोत्री कार्यकर्त्यांना बुकिंग केले आहे. उमेदवारी अर्ज भरतेवेळी प्रत्येक उमेदवाराने जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यावेळी मोठया प्रमाणात भाडोत्री कार्यकर्ते सहभागी झाले होते. तेच कार्यकर्ते १२ दिवस प्रचाराचे काम करणार आहेत.

हेही वाचा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजूर

- Advertisement -

प्रचार संपेपर्यंत कार्यकर्त्यांना बुकिंग करण्यात आले

प्रत्येक कार्यकर्त्याला पाचशे रूपये असा दर ठरविण्यात आला आहे. निवडणूक प्रचार संपेपर्यंत या कार्यकर्त्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. हातात पक्षाचा झेंडा आणि गळयात पक्षाचा पट्टा अडकवत हे भाडोत्री कार्यकर्ते उमेदवाराच्या नावाने घोषणाबाजी करीत प्रचार करणार आहेत. अनेक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण असाही कार्यक्रम ठेवला आहे. सध्या रिअल इस्टेटच्या व्यवसायात प्रचंड प्रमाणात मंदी आहे. त्यामुळे कामगार, मजूर पुरूष आणि महिला मोठया संख्येने भाडोत्री कार्यकर्ते म्हणून सहभागी होताना दिसत आहेत.

हेही वाचा मोदींची उदयनराजेंसाठी साताऱ्यात पहिली सभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -