घरमहाराष्ट्रराज्यातील अस्थिरता संपविण्यासाठी 'नीळकंठ' व्हायला तयार - शिवसेना

राज्यातील अस्थिरता संपविण्यासाठी ‘नीळकंठ’ व्हायला तयार – शिवसेना

Subscribe

सध्याच्या राजकीय घडामोडींवर 'सामना' मुखपत्रातून शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे.

‘भाजपबरोबर अमृताच्या पेल्यातील विषाचा घोट आम्ही रिचवल्यावर आता महाराष्ट्रातील अस्थिरता संपविण्यासाठी नीळकंठ व्हायला आम्ही तयार आहोत’, असे शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेवर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ठ केली आहे. भाजप आणि शिवसेना यांनी निवडणुकीपुर्वी युती जाहीर केली होती. मात्र, निकालानंतर त्यांचे बिनसले आणि शिवसेनेने भाजपसोबत असणारी युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेकांनी शिवसेनेवर टीका देखील केली. मात्र, यावर शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे.


हेही वाचा – ‘…तर शिवसेनेचं स्वागतच’, भाजपची नवी खेळी!

- Advertisement -

‘शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे’

”महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही आणि हा जनतेचा अपमान आहे. …वैगेर तत्ववादी विचार मांडणाऱ्यांनी एक समजून घेतले पाहिजे की, हा जो जनादेश मिळाला आहे तो दोघांना मिळाला आहे. दोघांनी मिळून ज्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले त्यास हा जनादेश मिळाला आहे. मात्र ते मानायला तयार नव्हते. म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्हाला स्वतंत्र पावले उचलावी लागली. याचा दोष कुणी आम्हाला का द्यावा? भारतीय जनता पक्ष हा तत्त्वाचा, नीतिमत्तेचा, संस्काराने वागणार पक्ष आहे असे म्हणतात. पण महाराष्ट्राच्या बाबतीत ही तत्त्वे आणि संस्कार त्यांनी पाळायला हवे होते. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसायला तयार आहे. याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठबळ द्यायला तयार आहे असा काढला तर त्यांना मिरच्या झोंबायच्या कारण नाही. ठरल्याप्रमाणे भाजप शब्दाला जागला असता तर परिस्थिती इतक्या थरास गेली नसती. शिवसेनेस जे ठरले आहे ते देणार नाही, भले आम्ही विरोधी बाकड्यांवर बसू हा डावपेचाचा भाग नसून शिवसेनेस पाण्यात पाहण्याचा दुर्योधनी कावा आहे”, अशा आक्रमक शब्दांत शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने भूमिका मांडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -