घरताज्या घडामोडीLive Update: मुंबई गेल्या २४ तासांत ४७३ नव्या रुग्णांची नोंद, ७ जणांचा...

Live Update: मुंबई गेल्या २४ तासांत ४७३ नव्या रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू!

Subscribe

गेल्या २४ तासांत मुंबईत ४७३ नवे रुग्ण आढळले असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९९ हजार ७९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ११ हजार २०२ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ८० हजार ३२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ९३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३ हजार २८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आता कोरोनाबाधितांची संख्या १९ लाख ७४ हजार ४८८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५० हजार १५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८ लाख ७१ हजार २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या राज्यात ५१ हजार ८९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मंत्रालयाच्या जुन्य इमारतीत शॉर्ट सर्किट झाले आहे. मात्र वेळीच स्विच बंद केल्याने धोका टळला आहे. सकाळपासून जुन्या इमारतीमध्ये लाईट नव्हत्या, लाईट नसल्याने अनेक विभागांची कामे बंद होती.


कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार जणांची समिती तयार केली आहे. कृषी कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दणका दिला आहे.


कोरोना लसीचे पहिले विमान अहमदाबादला रवाना झाले आहे. पुण्याच्या सीरम इंन्स्टिस्ट्यूट मधून सहा कोल्ड स्टोरेज अहमदाबादला रवाना झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -